Devyani Pharande, Chhagan Bhujbal & Ashok Murtdak
Devyani Pharande, Chhagan Bhujbal & Ashok Murtdak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News; `मनसे`खडसावले, ‘ऑक्सिजन' हवाय ‘कार्बन' नको!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या पांजरपोळच्या जवळपास ३२७ हेक्टर जागा उद्योगांसाठी संपादित करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) विरोध असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातर्फे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले. भाजपच्या (BJP) आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या या सुचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही पाठींबा दिला होता. (Do not go further for Panjarpol`s green lnad for Industries)

लाखो झाडे असलेली ही जमिन नाशिकचा ऑक्सिजन आहे. भविष्यातील पिढीला संकटात लोटणारे हे उपक्रम थांबवा, असा इशारा त्यांनी दिला आहे. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईडचा धूर शोषून घेणारे पांजरपोळचा ऑक्सिजन पार्कची कत्तल करण्यास विरोध आहे. त्याऐवजी या भागातील खासगी जमिनी संपादित करा, अशी स्पष्ट भूमिका घेताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ व भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना विरोध केला.

पांजरपोळची ३२७ हेक्टर जागा उद्योगासाठी शासनाकडे जाईल. यावरून सध्या नाशिक मध्ये राजकारण पेटले आहे. भाजपच्या आमदारांनी पांजरपोळ जागा एमआयडीसीसाठी मिळावी, अशी भूमिका घेतली असली तरी भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र सदर जागा संपादनाला विरोध दर्शविला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात उडी घेतली.

शुक्रवारी राज ठाकरे यांनी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे यांना मुंबईत बोलावून सदर प्रकरणाची माहिती घेतली. त्या वेळी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रकल्पाला विरोध नाही, मात्र अडीच लाख वृक्षतोडीला विरोध केला. तीच भूमिका नाशिकमध्ये स्पष्ट करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शनिवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करण्यात आली.

नाशिकच्या उत्तम वातावरणाला आणि पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या चुंचाळे येथील पांजरपोळकडे जवळपास दीड हजार गोधन असून चराईसाठी या क्षेत्राचा वापर केला जातो. ३२७ हेक्टर जमिनीवर अडीच लाखांहून अधिक वृक्षसंपदा व अडीचशे प्रकारचे प्राणी येथे वास्तव्याला आहे. नाशिकसाठी ऑक्सिजन देणारी फॅक्टरी म्हणूनही पांजरपोळची जागा ओळखली जाते. नाशिकचे हवामान टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांची गरज आहे.

कार्बन तयार करणारे कारखाने नको, कारखान्यांना विरोध नाही, परंतु या भागातील अनेक वर्षांपासून बिल्डरांच्या ताब्यात असलेल्या जागा संपादित करून त्यावर उद्योग उभारले जावेत अशी भूमिका मांडण्यात आली. शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, पराग शिंत्रे, सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, मनोज घोडके, बंटी लभडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT