Malegao Politics : उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मालेगावचे रस्ते खोदले!

पालकमंत्र्यांवर आरोप, मालेगाव शहरात येणारे रस्ते खोदल्याने राजकारण तापले.
Uddhav Thackeray & dig roads
Uddhav Thackeray & dig roadsSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : (Malegaon) शिंदे गटाचे (Eknath Shinde) बदंरे विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात आज शिवसेना (Shivsena) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्ते (Roads) खोदण्यात आले. त्यामुळे भुसे समर्थक व ठाकरे गटातील राजकारण शिगेला पोचले आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांबरोबरच भुसे यांच्या जुन्या सहकाऱ्यांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहे. (Contractors dig roads of Malegaon city`s entry)

Uddhav Thackeray & dig roads
Malegaon News; संजय राऊत मालेगावला, दादा भुसे काही दिसेना!

याबाबत दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भुसे समर्थकांनी रस्त्याची कामे सुरु असल्याने कंत्राटदारांनी रस्ते खोदले, त्याचा पालकमंत्र्यांशी संबंध नाही, असे म्हटले आहे. तर सभेचे आयोजक व शिवसेनेचे उपनेते अद्वय ठाकरे यांनी सभेला अडथळा यावा म्हणून रस्ते खोदल्याचा आरोप केला आहे.

Uddhav Thackeray & dig roads
Uddhav Thackeray In Malegaon : उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार : कुणाकुणाचा घेणार समाचार?

यासंदर्भात दादा भुसे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व बारा बलुतेदार मंडळाचे नेते बंडुकाका बच्छाव यांनी, रस्ते करा अशी मागणी नागरिकांनी केलेली नव्हती, तरीही रस्ते करण्यात आले. मग रस्ते खोदा असे कोणी सांगितले. या प्रकारे रस्ते खोदने, सभेचे फ्लेक्श फाडणे हे चांगले नाही. रस्ते करायचे असले तरीही दोन दिवस थांबल्याने काहीच बिघडले नसते, अशी नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २६ मार्चला येथे होणारी शिवगर्जना सभा न भुतो न भविष्यती असेल. या सभेस अडचणी निर्माण करण्याच्या कुटिल उद्देशाने विरोधक यांनी शहराच्या प्रवेश मार्गांवर जागो-जागी खड्डे खोदून अडथळा निर्माण केला आहे. विरोधकांच्या या मनोवृत्तीची कीव करावी वाटते. खड्डे खोदणाऱ्यांना जनता जागा दाखवेल असे शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Uddhav Thackeray & dig roads
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती आज राजकीय स्फोट करणार?

श्री. हिरे यांनी पत्रकात विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांनी सभेस अडथळा आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. शहरात येणाऱ्या चारही बाजूचे मुख्य रस्ते खोदून रहदारीस अडथळा निर्माण करण्यासाठी बॅरिकेट्स लावण्याचा व वाहतुकीची कोंडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व सामान्य नागरिक याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अशातच सभेच्या प्रचाराचे लावण्यात आलेले बॅनर्स फ्रेमसह चोरले जात आहेत. सभेची तयारी पाहून काही विरोधक अप्रिय घटना घडवून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com