NCP agitation in Nashik
NCP agitation in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मोदी साहेब, आम्ही बैलगाडीतून कॉलेजला जायचे का?

Sampat Devgire

नाशिक : पेट्रोल डीझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा (Petrol, Deisel prices continuesly increasing) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP youth wing prohibits Non stop price hike) अनोखा निषेध केला. विद्यार्थी बैलगाडीतून महाविद्यालयात गेले. यावेळी त्यांनी, मोदी साहेब आम्ही आता बैलगाडीने कॉलेजला जायचे का? असा प्रश्न असलेले फलक घेऊन घोषणा दिल्या.

इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यात यावी अशी मागणी करत आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांसह शहरात महविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात पोहोचवून अनोख्या पद्धतीने पेट्रोल डीझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी बोलतांना शहराध्यक्ष श्री. खैरे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसात सातत्याने पेट्रोल डीझेलची दरवाढ कायम असून नाशिकमध्ये आज पेट्रोलचा ११२.४६ तर डीझेल १०१.६५ रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढीचा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या कुटुंबाचे बजेट यामुळे संपूर्णपणे कोलमडून गेलेले आहे. याबाबत सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करत आहोत. पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. तरी देखील पेट्रोल डीझेलची दरवाढ थांबत नसून सर्व सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीझेलची सातत्त्याने होत असलेली दरवाढ रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज महाविद्यालय सुरु होण्याच्या मुहूर्तावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत उपहासात्मक आंदोलन केले करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ही पेट्रोल डीझेलची सातत्याने होणारी दरवाढ तातडीने रोखून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.

यावेळी डॉ अमोल वाजे, जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, विभाग अध्यक्ष निलेश भंदुरे, विशाल डोके, रामदास मेदगे, समाधान तिवडे, राहुल कमानकर, जाणू नवले, नवराज रामराजे, निलेश सानप, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, विशाल पगार, महेश शेळके, रेहान शेख, अक्षय पाटील, सिद्धांत काळे, दादा निगळ, शिवाजी मटाले राजाराम पाटील निगळ, शुभम गांगुर्डे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT