Ahmednagar BJP  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: नगर भाजप जिल्हाध्यक्ष निवडीला वेग; स्थानिक पदाधिकाऱ्यांशी 'वन टू वन' चर्चा

Ahmednagar News: अहमदनगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

सरकारनामा ब्यूरो

BJP News : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी करण्यासाठी सध्या चाचपणी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत अनेक जिल्ह्यात भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवरच अहमदनगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजप हालचाली करत आहे.

नगर शहरातील गांधी मैदान येथील भाजपच्या कार्यालयात गुरवारी (दि.11 मे) भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शहर व दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी पदाधिकाऱ्यांची प्रवक्ते भंडारी यांनी मते जाणून घेतली. तसेच पदाधिकाऱ्यांशी त्यांनी 'वन टू वन' चर्चा देखील केली. यावेळी अनेकांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

याबरोबरच अनेक जण या बैठकीला येताना आपल्या कामाच्या फायली घेऊनच उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणर? याची भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, नगर शहर व दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी आज शुक्रवारी शिर्डीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी देखील अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, या पदावर कुणाची निवड करायची याबद्दलचा अंतिम निर्णय हा पक्षाच्या प्रदेश पातळीवर होणार आहे.

त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या तरी जिल्हाध्यक्षपदासाठी जोरदार हालचाली सुरू असून आता कुणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT