Mumbai : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि.12 मे) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, याच दौऱ्यावरून शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"उद्धव ठाकरे हे गडाखांच्या वाढदिवसानिमित्त ते त्यांच्या भेटीला गेले आहेत. नैतिकता याला म्हणतात. ज्यांच्याकडून घेतलं त्यांच्या मिठाला जागलं पाहिजे", असा खोचक टोला शिरसाटांनी ठाकरेंना लगावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून नैतिकतेच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आता या पार्श्वभूमीवरच बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे स्वत:ला खूप तत्वज्ञानी समजतात. त्यांची पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी ऐकली. त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारल्या. उद्धव ठाकरे म्हणाले की नैतिकता होती म्हणून मी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांच्या वाढदिवसाला जायचं आहे. मग नैतिकता याला म्हणतात. ज्यांच्याकडून घेतलं, त्यांच्या मिठाला जागलं पाहिजे", असा खोचक टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकरराव गडाख यांनी सर्वप्रथम शिवसेनेला (ठाकरे गट) पाठिंबा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून शंकरराव गडाख यांना जलसंधारण मंत्रीपद मिळाले होते. यानंतर शिवसेना फुटीच्यावेळी गडाख हे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. त्यामुळे आता गडाख आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
(Edited By : Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.