Dr Subhash Bhamre With Envirnment lovers
Dr Subhash Bhamre With Envirnment lovers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खासदार सुभाष भामरे पर्यावरणप्रेमींना साद घालणार!

Sampat Devgire

धुळे : पांझरा नदी (Dhule) बारमाही प्रवाहित व्हावी. पांझरेला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढावे. तिची नियमित स्वच्छता व्हावी, यासाठी पांझरा काठ बचाव समितीचा २० वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. त्यात आता खासदार डॅा सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) देखील सहभागी झाले आहेत. (Dr Subhash Bhamre dedicate Panjhara river drive website)

याबाबत जनजागृतीसाठी पांझरा बचाव ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. धुळ्यात खासदार भामरे यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला.

खासदार भामरे म्हणाले, की पांझरा खानदेशची जलवाहिनी व संजीवनी आहे. राज्यात भाजप सरकार असताना, मोतीलाल पोतदार यांनी पाठपुरावा करून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून एक कोटी रुपये सर्वेक्षणासाठी मंजूर करून घेतले. पांझराचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे. पांझरा बारमाही वाहिली पाहिजे. नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. काठच्या लोकांनीही पांझरा आईची काळजी घेऊन स्वच्छता राखली पाहिजे.

पंतप्रधान मोदींना भेटणार

पांझराकाठ बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणेल व केंद्रातून भक्कम निधी मिळवून देईन, असा शब्द खासदार भामरे यांनी या वेळी दिला. पोतदार म्हणाले, की पांझरा बचावचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. वेबसाईटचे अभियंता केदार अहिरराव यांनी पांझरा काठची सखोल माहिती दिली. पांझरा काठ बचाव समिती गेल्या २०१५ पासून कर्यरत आहे. पांझरा वाचावी, यासाठी कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे.

पांझरा काठ बचाव समितेचे अध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस मोतीलाल पोतदार, जलमित्र रमेश पोतदार, भाजपचे जिल्हा संघटक किशोर सिंघवी व प्रशांत परदेशी उपस्थित होते.

---

पांझरा बचाव समितीने जनजागृतीचे काम म्हणून काठावरचे शेतकरी, जनता आणि पर्यावरणप्रेमींना एकत्र आणण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पांझरा परीक्रमा आयोजित केली आहे. https://panzarabachav.in/या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन बचाव समितीने केले आहे.

-मोतीलाल पोतदार, पांझरा बचाव समितीप्रमुख

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT