Nandurbar Z.P. Election campaign
Nandurbar Z.P. Election campaign Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बहिणीच्या प्रचारात खासदार हिना गावित यांची प्रतिष्ठा पणाला?

Sampat Devgire

दिनू गावित

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या तीन गटांची निवडणूक (3 gat of Z.P. election campaign) जिल्ह्यात चांगलीच गाजते आहे. (This Election in high mode due to political families) सर्व उमेदवारांनी प्रचारात झोकून देऊन संपर्क सुरु केला आहे. (All candidates busy in campaign) यामध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षात (Straight fight in Congress & BJP) सरळ लढत आहे. खापर, कोळदा, कोपरली आणि खापर गटात भाजपने प्रचारात आघाडी घेत (BJP took lead in Election campaign) प्रमुख नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणुक प्रतिष्ठेची ठरली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोटनिवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. सर्व उमेदवार राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांनी सर्व शक्ती झोकून प्रचारावर भर दिला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. काँग्रेसने गीता पाडवी यांना उमेदवारी दिली असून भाजपने नागेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. राजकीय पार्श्वभूमी व प्रचाराचा धुमाकूळ पाहता खापर गटात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याचा दावा पक्षाच्या उमेदवारांनी केला आहे. भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार राजेश पाडवी व भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून भाजपचे आमदार विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांनी राजकारणात पदार्पण केले असून आपल्या मुलीच्या विजयासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व बहीण खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

कोपरली गटात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी शिवसेने कडून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार पंकज गावित यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT