सुरगाण्याच्या प्रत्येक गावात हवी एक ममता बॅनर्जी!

पक्षाच्या परिवार संवाद या कार्यक्रमांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता संवाद उपक्रम सुरु आहे.
Jayant Patil NCP
Jayant Patil NCPSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीची ३५ वर्षाची (35 yers left Goverment fall) राजवट ममता बॅनर्जी यांनी उलथावून टाकली. (Mamta Banerjee does this) सुरगाणा तालुक्यात अशा ममता बॅनर्जी तयार झाल्या पाहीजे. (There shall be one Mamta Banerjee) आता प्रत्येक गावात ममता बॅनर्जी तयार करा पुढील २५ वर्षात सुरगाणा तालुक्यातील सर्व प्रश्न सुटतील, (Surgana Issues will Resolve) असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

Jayant Patil NCP
भाजपची इच्छा आहे; पण थोडीशी लाजते आहे!

पक्षाच्या परिवार संवाद या कार्यक्रमांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ता संवाद उपक्रम सुरु आहे. त्यानिमित्त सुरगाणा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तालुक्याच्या समस्यांबाबत चर्चा केली.

कळवण बरोबर सुरगाणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी व त्यांना बळ देण्यासाठी परिवार संवाद यात्रेनिमित्ताने संवाद साधण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ओतूर, श्रीभुवनसह कळवण, सुरगाणा तालुक्यातील सिंचन योजनांना गती देण्याचे काम केले जाईल. त्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Jayant Patil NCP
आमदार देवयानी फरांदे वाचवू शकतात राज्याचे ५०० कोटी?

यावेळी श्री. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून दिल्यानंतर (स्व) ए. टी. पवार यांच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम आमदार नितीन पवार करीत आहे. सुरगाणा आणि कळवणमध्ये गेल्या काळात विकासापेक्षा मोर्चे जास्त निघाले. मोर्चापेक्षा मंत्र्याकडे बसून शासन निर्णय घेण्याचे धोरण आमदार नितीन पवार यांनी राबविले असल्यामुळे ओतूर आणि श्रीभुवनला तरतूद झाली म्हणजे प्रकल्प मार्गी लागले.

यावेळी आमदार नितीन पवार, जेष्ठ नेते श्रीराम शेटे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शाखेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मविप्र संचालक सचिन पिंगळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, नारायण हिरे, चिंतामण गावीत, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com