Hemant Godse  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse Viral Video : खासदार हेमंत गोडसे यांची पोलिसांमध्ये धाव, आयुक्तांना दिले पत्र...

Shivsena Vs Congress : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार गोडसे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेसच्या नेत्याने ट्विट केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. गोडसे यांच्यावर नेटकऱ्यांनी देखील टीका केली.

Sampat Devgire

Nashik Political News : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विषयी वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेस नेत्याने सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमुळे हेमंत गोडसे यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आता हेमंत गोडसे यांनी 'मी गेली दहा वर्ष मी लोकांमध्ये वावरतो आहे. विरोधक मला हरवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी राजकारणातील हीन पातळी गाठली आहे.' या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. (Hemant Godse Viral Video)

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) गटाचे खासदार गोडसे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ काँग्रेसच्या नेत्याने ट्विट केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. गोडसे यांच्यावर नेटकऱ्यांनी देखील टीका केली. मात्र, राजकारणामध्ये जेव्हा एखाद्याचा पराभव करता येत नसेल, तेव्हा विरोधक अशा प्रकारच्या बोगस व खोट्या गोष्टी पसरवतात. माझ्या बाबतही तसेच घडले आहे. मात्र विरोधक त्यात कदापी यशस्वी होणार नाहीत, असा दावा खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी केला आहे.

पोलिस आयुक्तांना पत्र

खासदार गोडसे यांनी शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना पत्र लिहिले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. असे षडयंत्र रचणाऱ्या व खोट्या गोष्टी पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. मी केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाला आहे. मला नागरिकांच्या मनातून कोणीही दूर करू शकत नाही. त्यामुळे माझ्या विरोधात राजकीय विरोधकांनी षडयंत्र रचले आहे, असे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चौकशीतून सत्य बाहेर येईल...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या काळात अशाप्रकारे मॉर्फ केलेला खोटा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून एक मोठे कारस्थान विरोधकांनी रचले आहे. मात्र चौकशीतून यातील सत्य बाहेर येईल आणि विरोधक तोंडावर पडतील, असा दावा देखील खासदार गोडसे यांनी केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT