Sanjay Raut : 'राजकारणातील सगळ्यात मोठे ढोंगी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे'; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut Criticizes CM Eknath : मुख्यमंत्री हे राजकारणातील सगळ्यात मोठे ढोंगी असल्याची संजय राऊतांची टीका
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Pune Sanjay Raut Press Conference News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लक्ष केले आहे. मुख्यमंत्री हे राजकारणातील सगळ्यात मोठे ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला.'रवींद्र वायकर यांची 'ईडी'कडून चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, ईडी ही भाजपाची उपशाखा झाली आहे. जे भाजपसोबत नाहीत त्यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. जेलमध्ये टाकलं जातं रोहित पवार यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. आम्ही मात्र भाजपाच्या या दडपशाहीला घाबरणार नसल्याचं राऊत यांनी सांगितल'.(Sanjay Raut Press Conference )

Sanjay Raut
Supriya Sule News : नितीशकुमार यांच्या भूमिकेनंतर ताईंचे सूचक वक्तव्य

संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरती 'आयएनएस विक्रांत घोटाळ्याचे आरोप करत नाव न घेता हा मुलुंडचा नागडा मोकळा कसा? असा सवाल केला. तसेच अजित पवार यांचा 70 हजार घोटाळा, शिखर घोटाळा हे तर पंतप्रधान सांगत होते. मात्र, आता सगळे विसरून गेले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर होणाऱ्या ईडीच्या कारवाया राजकीय सुड बुद्धीतून केल्या जात आहेत. आम्हाला तुरुंगात टाकण्यात येत आहे. मला एकदा तुरुंगात टाकून झालं आहे. परत फासावर लटकावयाच आहे तर लटकवा, आम्ही मागे हटणार नाही.' असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut Criticises CM Eknath Shinde)

Sanjay Raut
Sanjay Raut News : नगरमधील आमदारांच्या साडू - व्याह्यांच्या गुंडगिरी विरोधात राऊत आक्रमक ; काढणार महामोर्चा...

ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची पक्षांतर्गत बंदी समितीमध्ये नियुक्ती केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, हा सगळ्यात मोठा फ्रॉड झाला आहे . नार्वेकर हे दहा पक्ष बदललेले माणूस आहेत. ते सध्या भाजपाचे हस्तक म्हणून काम करत असून त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी दिला आहे. त्यांची नियुक्ती हा देशाच्या घटनेचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना राऊत म्हणाले सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या मंत्रिमंडळात मतभेद दिसत आहेत. छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका असायला हवी त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेत असतील तर त्यांच्यावरती तत्काळ त्या मंत्र्यांवर बरखास्तीची कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळं ठरवून चाललं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सामावून घेण्याबाबत बोलताना राऊत म्हणाले 'उद्या आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीचा वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने आमंत्रण दिलं आहे आणि ते त्यांनी स्वीकारले देखील आहे. देशातील सरकार विरोधात आंबेडकरांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे जागावाटप हा किरकोळ मुद्दा असल्याचं' राऊत त्यांनी सांगितलं.

इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घेत आहोत. राजू शेट्टी ( Raju Shetti) यांच्याशी चर्चा झाली आहे. संभाजी राजे यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू तसेच इतर छोट्या मोठ्या पक्षांशी देखील आमची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत मराठा आंदोलनाचा मुद्दा ज्याप्रकारे हाताळला त्यामुळे मुख्यमंत्री स्ट्राँग मॅन झाले आहेत. असे आंबेडकर म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्राची जनता ही ढोंग आणि खोटेपणाच्या मागे कधी गेली नाही. शिंदे हे इतिहासामधील सर्वात मोठं ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut
LokSabha Elections 2024 : राऊतांनी वाढवली पवारांची धडधड; ठाकरे गट किती जागा लढवणार? आकडा केला जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com