भुसावळ : मध्य रेल्वेच्या (Railway) भुसावळ मंडळांतर्गत रेल्वे विभागाच्या विविध विकासकामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालयात खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) व डीआरएम एस. एस. केडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.
बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेस्थानक तसेच भुसावळ रेल्वेस्थानक येथील प्रगतिपथावर असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच रेल्वे मंत्रालयाने भुसावळ मंडळांतर्गत प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांची विकासकामे, भुसावळ मंडळांतर्गत असलेल्या रेल्वे मार्गांवर नव्याने बनविण्यात येणाऱ्या आरओबी व आरयूबी कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
या वेळी भुसावळ स्थानक येथे प्रलंबित विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. खासदार रक्षा खडसे यांच्यासह झेडआरयूसीसी सदस्य परिक्षित बऱ्हाटे, डीआरएम एस. एस. केडिया, एडीआरएम नवीन पाटील, आर. मीणा, सीनिअर डीसीएम युवराज पाटील, सीनिअर डीओएम आर. के. शर्मा व संबंधित रेल्वे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
धार्मिक स्थळे काढू नका!
रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे संबंधीच्या तसेच रेल्वेच्या इतर कामांचा आढावा घेऊन भुसावळ शहरांतर्गत आराधना कॉलनी भागातील ड्रेनेजची कामे तत्काळ मार्गी लावावी, याबाबत डीआरएम केडिया तथा रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार खडसे यांनी सूचना केल्या. तसेच आपल्या स्तरावरून रेल्वे मंत्रालयास कोणकोणत्या बाबींचा पाठपुरावा करावा, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. भुसावळ शहरांतर्गत रेल्वे विभागामार्फत सध्या काढण्यात येत असलेल्या अतिक्रमणांमध्ये कोणतीही धार्मिक स्थळे काढण्यात येऊ नये, याबाबत विशेष सूचना केल्या.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.