नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांना नियमबाह्य कर्जवितरणासाठी जबाबदार धरण्यात आले होते. याबाबत विभागीय उपनिबंधकांनी सहकार कायद्यातील तरदीनुसार १८२ कोटी रुपयांची भरपाईचे आदेश दिले होते. त्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेते, आमदार, खासदारांचा समावेष होता.
गेल्या महिन्यात याबाबतचे आदेश सहकार उपनिबंधकांनी काढले होते. यामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३४७ कोटी रुपयांच्या अनियमित कर्ज वितरण प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता. त्यात बँकेच्या २९ आजी-माजी संचालक, अधिकाऱ्यांकडून १८२ कोटींच्या वसुलीची आदेश बजावले होते. त्याबाबत काही संचालकांनी त्यावर विभागीय सहकार उपनिबंधकांकडे स्थगितीची विनंती केली होती. मात्र त्यावर विचार झाला नाही.
भऱपाई वसुलीच्या प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी या संचालकांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. मात्र संचालकांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे संचालक तणावात होते.
यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्याला तात्पुरती स्थगिती दिली. बँकेच्या विद्यमान संचालकांत आमदारांसह माजी आमदारावर अनियमित कर्जवाटप प्रकरणी जबाबदारी निश्चित झालेली आहे. या संचालकांकडून १८२ कोटी रुपयांच्या वसुलीची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली होती. त्याविरोधात या संचालकांनी सहकारमंत्र्याकडे धाव घेतली होती. सहकारमंत्र्यांनी याबाबत प्रतिवादी असलेल्या जिल्हा बँक, संबंधित चौकशी अधिकाºयांकडे अहवाल मागविला होता. त्यावर सुनावणी होऊन सहकार मंत्र्यांनी अखेर वसुलीच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिल्याने या आजी माजी संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे आहेत संचालक...
आमदार नरेंद्र दराडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार डॅा. राहूल आहेर, माणिकराव शिंदे, नानासाहेब पाटील, वैशाली अनिल कदम, अद्वय हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, धनंजय पवार, संदीप गुळवे, परवेझ कोकणी, जे. पी. गावित, माणिकराव बोरस्ते, डॅा शोभा बच्छाव, डॅा. सुचेता बच्छाव, शिरीष कोतवाल, माजी आमदार अनिल आहेर, वसंत गिते, चंद्रकांत गोगड, गणपतराव पाटील, राजेंद्र डोखळे, नानासाहेब भोसले, राजेंद्र भोसले, सुनिल ढिकले आणि दत्ता गायकवाड.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.