Ramdas Athawale and Sadashiv Lokhande
Ramdas Athawale and Sadashiv Lokhande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : रामदास आठवलेंच्या एका वाक्याने शिंदे गटाचे खासदार लोखडेंचं टेन्शन वाढलं

सरकारनामा ब्यूरो

Sadashiv Lokhande : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या एका वाक्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार सदाशिव लोखंडे यांचं टेन्शन वाढलं आहे. रामदास आठवले यांनी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा 2024 ची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक आपण लढवणार असून याबाबत शिर्डीत पुढील महिन्यात राष्ट्रीय अधिवेशन घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना केले.

यावेळी आठवले म्हणाले, ''मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकदा पराभूत झालो. पण मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. जर भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढवणार आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल'', असं आठवलेंनी सांगितलं.

तसेच राज्यातलं सरकार पडणार या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, ''आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. येत्या निवडणुकीतही आम्ही सर्व एकत्र येऊन निडणुका लढणार आहोत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्येही आमचाच विजयी होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. पण रामदास आठवले यांनी 2024 ची लोकसभेची निवडणूक शिर्डी मतदारसंघातून लढवण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सदाशिव लोखंडे यांचं टेन्शन वाढलं आहे.

या आधी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आठवले शिर्डीतून लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT