Maharashtra Politics : इंदापूरमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगली राजकीय धुळवड!

Pune : इंदापूरसाठी रविवार ठरला राजकीय रंगपंचमीचा वार
Indapur Politics
Indapur PoliticsSarkarnama

Indapur : इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या निधीवरून राजकीय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे इंदापूरमध्ये रंगपंचमीच्या दिवशीच राजकीय धुळवड पाहायला मिळाली.

यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला. तर विरोधकांनी स्वतःचे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावे, असा टोला दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला.

यामध्ये सकाळी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने आयोजित बैठकीत परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी पक्ष विरहित राजकीय भूमिका मांडताना धनगर समाजासाठी निधी दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. मात्र, भाजपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

ज्या पक्षाने आमच्या समाजाला जास्तीत जास्त संधी दिली. त्यांच्या पाठीमागे समाजाने उभा राहण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

Indapur Politics
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील केबल इंटरनेट नेटवर्कचे काम देऊ घातलेली कंपनी निघाली 'ब्लॅक लिस्टेड'

त्यानंतर काही वेळातच शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत इंदापूरमध्ये आजी-माजी आमदारांना लोक कंटाळले असून तिसरा सक्षम पर्याय देण्याची घोषणा करत इंदापूर तालुक्यात शिवसेना-भाजप युती होणार का? अशी शंका इंदापूरकरांच्या मनात उपस्थित केली.

यानंतर दुपारी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पाचे कौतुक करीत इंदापूर तालुक्यासाठी आणलेला निधी हा शिंदे - फडणवीस सरकारने दिल्याचे जाहीर करीत इंदापूर तालुक्याच्या आमदाराला नाव न घेता पोस्टमनची उपमा दिली.

Indapur Politics
CPM Long March; 'लाल वादळ' पुन्हा विधानभवनावर धडकणार; अधिवेशनातच सरकारची डोकेदुखी वाढली...

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे मंजूर करण्यासाठी मी सक्षम असून, आता आणलेला निधी म्हणजे 'ए तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है' असे सांगत येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार असल्याचे सुतोवाच केले.

तसेच तालुक्याच्या विकासकामांसाठी आपण खंबीर असल्याचे सांगत विरोधकांनी स्वतःचे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावे, असा टोला हर्षवर्धन पाटलांना लगावला. दरम्यान, एकंदरीत संपूर्ण रविवार हा इंदापूरकरांसाठी राजकीय रंगपंचमीचा ठरला हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com