प्रदीप पेंढारे
Nagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले. त्यानिमित्ताने शिर्डीत मोठा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होऊन दोन दिवस उलटत नाही, तोच खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे टेलच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. (MP Sadashiv Lokhande's 'ultimatum' to the authorities for Nilavande dam water)
निळवंडे धरणाच्या टेलच्या चितळी-धनगरवाडी लाभधारक शेतकऱ्यांचे अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनावर अवलंबून आहे. सध्या टंचाईची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निळवंडे कालव्याच्या पाण्याची दुसरी चाचणी यशस्विपणे होण्याच्या मार्गावर असताना चितळी-धनगरवाडी शिवारातील काम संथ गतीने सुरू आहे. रेल्वेलाइनच्या पुढचे सुमारे तीनशे मीटरचे काम होणे बाकी आहे. त्या कामाला गती मिळत नाही. ते काम झाले, तरच ओढ्याला पाणी सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी कैफियत लाभकारक शेतकऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोर मांडली.
चितळी-धनगरवाडी शिवारातील निळवंडे टेलच्या शेतकरी लाभधारकांनी खासदार लोखंडे यांची भेट घेऊन अपूर्ण कामांची माहिती दिली. त्यावर खासदार लोखंडेंनी संबंधित अधिकारी आणि कामाच्या ठेकेदारांशी संपर्क साधून पुढील तीन दिवसातं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'रेल्वेलाइनच्या भागातील टेलचे काम पूर्ण करा. पाणी सोडण्याचे नियोजन करा. तीन दिवसांत काम पूर्ण झाले पाहिजे', असा अल्टिमेटम खासदार लोखंडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.