PDCC Bank Byelection : पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी अजित पवार कोणाला संधी देणार?; पार्थ पवारांसह 'ही' तीन नावे चर्चेत

Ajit Pawar Resign District Post : उपमुख्यमंत्री अजित पवार हे १९९१ पासून सलग ३२ वर्षे पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक होते.
Pdcc Bank By Election
Pdcc Bank By ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी येत्या आठ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. पवार यांच्या जागेवर कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला आहे. या जागेसाठी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार आणि मदनराव देवकाते यांचे नाव चर्चेत आहे. पण अजित पवार कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे. (Voting for post of director of Pune District Cooperative Bank on November 8)

उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे अजित पवार यांनी १० ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदासाठी सहकार विभागाकडून मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसार येत्या आठ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या अगोदर हे पद बिनविरोधही होऊ शकते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pdcc Bank By Election
Baramati News : अजितदादांच्या कार्यक्रमाला विरोध कायम; बारामतीतील मराठा क्रांती मोर्चा-प्रशासनातील बैठक फिस्कटली

पुणे जिल्हा बॅंकेच्या रिक्त संचालकपदी अजित पवार कोणाला संधी देणार याची उत्सुकता संपूर्ण पुणे जिल्ह्याला आहे. अजितदादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांची बॅंकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून राजकारणाची दुसरी इनिंग सुरू होऊ शकते, अशी शक्यता राजकीय धुरिणांमधून व्यक्त केली जात आहे. पार्थ पवार यांनी लोकसभेची मागील निवडणूक ही मावळमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून पार्थ यांना पुन्हा राजकारणात आणले जाते का, हेही पाहावे लागेल.

पार्थ पवार यांच्याशिवाय सुनेत्रा पवार, मदनराव देवकाते यांचीही नावे चर्चेत आहेत. सुनेत्रा पवार यांचे नाव बारामती लोकसभेसाठी घेतले जात आहे. त्यामुळे त्यांना बॅंकेत संधी मिळते की नाही, हे पाहावे लागेल. मागील निवडणुकीच्या वेळी डावलण्यात आलेल्या देवकाते यांना संधी मिळण्याची शक्यता तालुक्यातून व्यक्त होत आहे. मदनराव देवकाते सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी तेही तीव्र इच्छूक होते. मात्र, माळेगावमध्येही त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे जातीय समीकरणाचा विचार करून जिल्हा बॅंकेच्या संचालकपदासाठी मदनराव देवकाते यांनाही लॉटरी लागू शकते.

Pdcc Bank By Election
Maratha Reservation : मोहोळमधील २१, तर माळशिरसमधील २० गावांत नेत्यांना ‘नो एन्ट्री’

उपमुख्यमंत्री अजित पवार हे १९९१ पासून सलग ३२ वर्षे पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक होते. ते बारामतीच्या अ वर्ग मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांनी बॅंकेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. अजित पवार जेव्हा १९९१ मध्ये संचालक झाले, त्यावेळी बॅंकेची उलाढाल ही ५५८ कोटी इतकी होती. मात्र, अजित पवार यांनी बॅंकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुणे जिल्हा बॅंकेची उलाढाल ही २० हजार ७१४ कोटींवर पोचली आहे.

Pdcc Bank By Election
Sule Reply To Modi : मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; ‘याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com