Ahmednagar : अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवीन संसद भवनात आपल्या निवेदनाला सुरुवात करून चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन करतानाच उपस्थित संसद सदस्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी 'वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो गए आसमान से, रखकर चांद पर कदम आज हमने इतिहास बना दिया, जिनको शक था हमारी काबिलियत पर, आज उन सबको गवाह बना दिया अशी शेरोशायरीतून कौतुकोद्गार काढले.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवीन संसद भवनात चांद्रयान ३ (Chandrayaan 3) मोहीम यशस्वितेबद्दलच्या चर्चेत सहभाग घेत खासदार सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी दहा मिनिटांच्या भाषणाने छाप सोडली. खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil) म्हणाले, या मोहिमेत १०० महिला वैज्ञानिक होत्या. चांद्रयान ३ मोहिमेकडे नारीशक्तीचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाईल असेही ते म्हणाले.
विरोधकांवर टीका करताना विखे म्हणाले, लहानपणी आम्ही नेहमी ऐकलेली कविता चंदामामा दूर के पुए पकाए पुरके,आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली मे या हिंदी कवितेचा दाखला देत ते म्हणाले, अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत तसेच आहे. स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरीबाला साधे पाणी पण दिले नाही. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या घरा पर्यंत पाणी पोहचविले.
चांद्रयान २ अयशस्वी झाल्यावर इस्रोचे संचालक हे खूप नाराज झाले होते. मात्र, नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी त्यांना त्यावेळी नुसता धीर दिला नाही तर त्यांना पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान ३ मोहीम करण्यास भाग पाडले. मोहीम जगात सर्वात यशस्वी करणारा आपला भारत देश हा पहिला ठरला. या यशस्वी मोहीमबद्दल त्यांनी शेरोशायरी सादर केली.
"ये चांद तेरी जिद के आगे क्या मैं नतमस्तक हो जाऊँगा,
तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आजाऊँगा।
तू दूर है भले ही मुझसे ,पर पास कभी तो आएगा।
है प्रेम अमर मेरा तुझसे,मैं उसको छोड ना पाऊँगा।
उस बार जिद चलेगी मेरी ,उसको याद दिलाऊंगा।
तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आऊँगा, मैं फिरसे वापस आऊँगा।
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.