Women Reservation Bill : ऐतिहासिक ! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

Special Session In New Parliament : राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 171मते पडली.
Women's Reservation
Women's ReservationSarkarnama
Published on
Updated on

Women Reservation Bill Live Updates : मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) बहुमताने मंजूर झाले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.२१) राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 171 मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. त्यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली होती. तर या विधेयकाविरोधात दोन मते पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले होते. त्यानंतर राज्यसभेच्या निर्णयाकडे लक्ष लागले होते. विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा झाली. त्यानंतर मतदान झाले.

Women's Reservation
Asim Sarode On Shirsat : ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंनी शिरसाटांना फटकारलं, म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांची वकिली करण्याचा...''

लोकसभेमध्ये एमआयएमच्या दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. राज्यसभेमध्ये एमआयएमचा एकही खासदार नाही. लोकसभेपेक्षा राज्यसभेत मतदानाची प्रक्रिया लवकर पार पडली कारण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान झाले.

राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग होणार आहे. असे असले तरी हा कायदा लगेच लागू होणार नाही. त्यासाठी आधी जनगणाना झाल्यानंतर ते लागू होऊ शकते.

Edited by : Amol Jaybhaye

Women's Reservation
Women Reservation Bill : मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com