MP Sujay Vikhe Patil
MP Sujay Vikhe Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : ...तर कदाचित ही निवडणूक झाली नसती; खासदार विखेंचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar District Central Co-operative Bank: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागलेलं होतं. तसेच या अध्यक्ष निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता.

भाजप नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी चमत्कार घडवत शेवटच्या क्षणी बाजी पलटवली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मात्र, आता खासदार सुजय विखे( MP Sujay Vikhe Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले विजयी झाले. त्यांचा सत्कार खासदार सुजय विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारमध्ये राजकीय रंग देण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागली.

तसेच विरोधी पक्षनेत्यांनी भाजप संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विरोधकांना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवला आहे असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

विखे म्हणाले, ''विरोधकांना या निवडणुकीमुळे भाजपमध्ये कुठलीही विसंगती नसल्याचा नक्कीच बाेध झाला असेल. भाजपच्या संचालकांना विश्वासात घेतले असते, तर कदाचित ही निवडणूक झाली नसती. परंतु, यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच बँकेचा कारभार केला जाईल असंही विखे यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार आणि थोरातांना धक्का...

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिलेंची वर्णी लागल्यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांना मोठा धक्का बसला. कारण मंगळवारी (दि.7 ) पवार आणि थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांची बैठक घेत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत रणनीती आखली होती.

त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होईल अशी शक्यता होती. मात्र, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अर्ज दाखल केला तसेच निवडूनही आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT