Nitin Laddha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Vs BJP : खासदार उन्मेष पाटील यांनी दहा महिन्यांत साधा रस्ताही केला नाही!

Sampat Devgire

Jalgaon Politics : शिवसेनेचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी नुकतेच महापालिका डॉ. विद्या गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी जळगावच्या विमानसेवेमुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा दावा केला आहे. या पत्रात त्यांनी खासदार पाटील यांच्यावर टिका केली आहे. (Shivsena`s Ex Mayor claim that BJP MP Unmesh Patil is incompetent)

जळगाव (Jalgaon) महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) गटाचे नेते नितीन लढ्ढा यांनी भाजपच्या (BJP) खासदारांवर टिका केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपमध्ये राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात लढ्ढा म्हणाले, शहरात लवकरच विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे जळगावचे अर्थकारणही बदलणार आहे. परंतु विमानसेवा सुरू होणाऱ्या विमानतळापर्यंत जाणाऱ्या अजिंठा चौफुली ते कुसुंबा विमानतळ मार्गावरील अडथळे हटविण्यासाठी महापालिकेने तत्पर असले पाहिजे.

माजी महापौर लढ्ढा यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्राचे विशेष महत्त्व आहे. महापालिकेत लोकनियुक्त पदाधिकारी व नगरसेवक असताना माजी महापौर नितीन लढ्ढा सत्ताधारी शिवसेनेचे नेते होते, त्या वेळी त्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सभागृहात अनेकवेळा विकासाबाबतच्या चर्चेत सहकार्य केल्याचे दिसून आले.

आयुक्त डॉ. गायकवाड सध्या प्रशासक म्हणून काम करीत आहेत. शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांना पत्र लिहून लढ्ढा यांनी या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आयुक्त त्यांच्या पत्राला किती सकारात्मक घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

माजी महापौरांनी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांचा देखील या पत्रात उल्लेख केला आहे. खासदार पाटील विकासकामांबाबत अकार्यक्षम असल्याचा पत्रात उल्लेख आहे. खासदार पाटील यांच्याशी आपण १३ फेब्रुवारी २०२३ ला दुरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी त्यांना शहराच्या विकासासाठी अजिंठा विमानतळ रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यांबाबत समस्या मांडल्या होत्या. खासदारांनी पंधरा दिवसांत हा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दहा महिन्यांनंतरही त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT