Drug Mafia Lalit Patil : ललित पाटील कायम हॉस्पिटलमध्येच राहिला!, फडणवीसांची धक्कादायक माहिती

Drug Mafia Lalit patil Case, Sasoon hospital dean inquiry will be take place-विधान परिषदेत ललित पाटील प्रकरणावर झालेल्या चर्चेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली धक्कादायक माहिती
Devendra Fadanvis & Lalit Patil
Devendra Fadanvis & Lalit PatilSarkarnama
Published on
Updated on

Lalit Patil Drug Mafia News : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावर आज विधान परिषदेत अतिशय गंभीर चर्चा झाली. यावेळी हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. यामध्ये खोलवर जाऊन तपास करावा लागेल. या प्रकरणात ललित पाटील २०२० पासून जेव्हा जेव्हा पकडला गेला, तेव्हापासून तो एकदाही तुरूंगात राहिलेला नाही, तो नेहमीच रुग्णालयात राहिला, अशी धक्कादायक माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. (Home Minister Devendra Fadanvis assures strict action against All involve in Drug connection)

राज्यभर (Maharashtra) चर्चेत असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी विविध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर याबाबत ससून रुग्णालयाचे (Pune) अधिष्ठाता संजीव ठाकूर यांचा तपास केला जाईल. त्यात अधिक खोलवर जाऊन तपास करू असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांनी दिले.

Devendra Fadanvis & Lalit Patil
Rajasthan Election: राजस्थानमध्ये बंडखोरांनी वाढवली डोकेदुखी; काँग्रेस, भाजपचे 737 बंडोबा उतरले रिंगणात

आज विधान परिषदेत विविध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. ते एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. त्यामुळे त्याचा तपास अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे राज्यातील ४५ युनिटमध्ये अँटी नार्कोटिक्स पथक निर्माण करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत सर्व राज्यांत समन्वयावर भर देण्यात आला आहे. विविध राज्यांत परस्परांत माहितीची देवान घेवान होत असल्याने तपासाला चांगले यश मिळाले.

यावेळी गृहमंत्र्यांनी राज्य शासन याबाबत अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी कमर्शियल ड्रग्जचे प्रमाण १० ग्रॅमवर ऐवजी ५ ग्रॅम करण्यात आले आहे. ससून रुग्णालयात ललित पाटील यांच्यावर सात महिने कोणते उपचार झाले, त्यात अधिष्ठाता ठाकूर यांचा सहभाग निश्चित झाल्यावर त्यांच्यावर देखील कारवाई होईल. त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांनी २०२० पासून ललित पाटीलला जेव्हा जेव्हा अटक झाली, तेव्हापासून तो सतत रुग्णालयातच राहिला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जर त्याचे आजार पाहिल्यास ही व्यक्ती चालू कसा शकते, असा प्रश्न पडतो. याबाबत त्याच्यावर उपचार करणारे डॉ. देवकाते यांचीही चौकशी केली जाईल.

याबाबत खालपासून वर अशी कारवाई होत आहे. याबाबत इन्स्टाग्राम, डार्कनेट, कुरीअर एजन्सी यावर देखील पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यात लगेचच जामीन होतो. खालून वर अशी कारवाई करण्यात येत आहे. याबाबत २,३६९ संशयीत पानटपऱ्या तोडल्या, ३८,७७३ ई सिगरेटस् बाबत कारवाई केली. १७४ नायझेरीयन नागरिकांवर कारवाईकेली आहे. त्यांना मुक्त फिरता येऊ नये म्हणून मुंबईत एक डिटेन्शन सेंटर केले आहे. हुक्का पार्ललवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Devendra Fadanvis & Lalit Patil
Sharad Pawar : वाढदिवसाला शरद पवार यांना नाशिककरांनी दिली अनोखी भेट!

गृहमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, २ एप्रिल २०२१रोजी पुण्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शासनाला ललित पाटील यांची पोलिस कोठडी आवश्यक आहे. मात्र त्याला न्यायालयीन कोठडी आहे. त्याला पोलिस कोठडी आवश्यक असल्याने उच्च न्यायालयात दाद अपील करण्याची मागणी केली होती, मात्र शासनाने त्यावर निर्णय घेतला नाही, असे सांगितले.

या चर्चेत सचिन अहिर, भाई जगताप, राजहंस, अनिल परब, अंबादास दानवे आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. सत्यजीत तांबे, प्रवीण दटके यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही.

Devendra Fadanvis & Lalit Patil
Sanjay Raut : "नेहरू, गांधींवर टीका; मग मोदी त्यापेक्षा वेगळे आहेत का" ?...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com