Maharashtra ST Bus News : एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्डच्या रिचार्ज पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे.
आता प्रवाशांना या कार्डमध्ये केवळ पाच रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. तसेच पाच रुपयांच्या पटीत हवी तेवढी रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतधारकांना या निर्णयाचा विशेष फायदा मिळणार आहे.
आता पाच रुपयांच्या पटीत रिचार्जची सुविध एनसीएमसी कार्ड रिचार्ज करताना प्रवाशांना यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या. रिचार्जसाठी आकारले जाणारे शुल्क आणि कार्डमध्ये प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम यामध्ये फरक पडत होता. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाया जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाने (MSRTC) रिचार्ज शुल्क व्यवस्थेत बदल केला आहे. आता पाच, दहा, 15, 20 अशा पाच रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल. आवश्यक तेवढीच रक्कम कार्डमध्ये जमा करता येणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळेल.
रिचार्ज शुल्कातही बदल एनसीएमसी कार्डमध्ये टॉपअप करण्यासाठी अधिकृत एजंटला प्रत्येक व्यवहारामागे 11.80 रुपये कमिशन दिले जात होते. या रकमेत विविध करांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवाशांनी (Maharashtra) भरलेली रक्कम आणि कार्डमध्ये जमा होणारी रक्कम यामध्ये तफावत निर्माण होत होती. यातून गोंधळ उडायचा.
एनसीएमसी कार्डच्या नावाखाली काही ठिकाणी, विशेष करून ग्रामीण भागात प्रवाशांची आर्थिक फसवणूक देखील होती होती. यासाठी अधिकृत एजंट आणि एसटी बसमधील वाहकांकडून टॉपअपसाठी एकसमान शुल्क आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवहारावर नियमानुसार कर आकारला जाणार असून रिचार्ज प्रक्रियेत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांना भीम अॅपच्या माध्यमातून एनसीएमसी कार्डमध्ये पैसे भरता येतील. याशिवाय एसटी बसमधील वाहक, बसस्थानकांवरील टॉपअप काउंटर आणि अधिकृत एजंट यांच्याकडूनही रिचार्ज करता येणार आहे. प्रवाशांची, विशेष करून एसटी प्रवाशांची, ग्रामीण भागातील प्रवाशांच्या आर्थिक फसवणुकीला लगाम लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.