Nashik Political News : नाशिक महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत सर्वांधिक चर्चा झाली ती बहुचर्चित अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या विजयाची. शहाणे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांना पराभूत करुन अपक्ष असतानाही बाजी मारली. परंतु आपल्या विजयाच्या आनंदात असलेल्या शहाणे यांच्या कार्यकर्त्यांवर मात्र एका महिलेने गंभीर आरोप केले आहे.
कामटवाडे परिसरात अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवल्याचा गंभीर आरोप स्थानिक महिलेने केला आहे. नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलाला व सुनेला मारहाण केल्याचा आरोप करुन एका महिलेने पोलिसांवर रोष व्यक्त करत त्रिमुर्ती चौकात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी एका टोळक्याने कामटवाडे परिसरात धुडगूस घातला. काही नागरिकांना मारहाण करत असताना मार्गावरून जाणाऱ्या एका दाम्पत्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमोल पाटील व त्याच्या काही साथीदारांनी या दाम्पत्यालाच लक्ष्य करत दोघांनाही काही कारण नसताना बेदम मारहाण केली.
हाणामारीदरम्यान संबंधित व्यक्तीला मारले जात असताना त्याची पत्नी मध्ये पडली. परंतु टोळक्याने त्याच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. जखमी महिलेला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर पोलीस तक्रार घेत नसल्याने मारहाण झालेल्या महिलेच्या सासूने आपल्या अंगावर पेट्रोल टाकून भररस्त्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मारहाण करणारे संशयित हे अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांचे कार्यकर्ते असल्याने तक्रार घेण्यास व गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला.
दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून भररस्त्यात त्रिमुर्ती चौकात आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संबधित महिला माझ्या मुलाला व सुनेला न्याय द्या अशी हाक देत होती. शंभर टक्के न्याय देणार असे पोलिस आश्वासन देत महिलेची समजूत काढत आहे. संबधित महिला शहाणे यांच्या मुर्ताबाद अशा घोषणा देताना दिसत आहे.
दरम्यान हे संपूर्ण राजकीय षडयंत्र असून, मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अपयश न पचल्याने अशा पद्दतीने घटना घडत आहेत. पोलिस याबाबत नक्कीच योग्य तो तपास करतील असा खुलासा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.