BJP Malegaon : बलाढ्य भाजपला मालेगावात फक्त दोनच जागा जिंकता आल्या, कोणी केली गद्दारी?

Malegaon municipal election : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या रिंगणात २६ जागा भाजपने लढवल्या. पण फक्त दोनच जागा भाजपच्या निवडून आल्या. भाजपच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला. शिवसेना भाजपला भारी पडली.
Malegaon municipal election, devendra fadnavis
Malegaon municipal election, Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics : बलाढ्य भाजपला महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. राज्यातील २९ महापालिकांपैकी १८ महापालिकांवर भाजप पूर्णपणे स्वबळावर सत्तेत आहे. इतर महापालिकांमध्येही भाजपचे कमळ फुलले असून भाजप सत्तेत भागीदार राहील. परंतु ज्या काही मोजक्या महापालिका भाजपच्या हातून निसटल्या त्यात मालेगाव महापालिकेचा समावेश होतो.

मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने मालेगाव महापालिका निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २६ जागा लढवल्या. परंतु त्यातील फक्त दोनच जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. गेल्यावेळी ९ जागा मिळवणारे भाजप यावेळी खाली घसरले आहे. याउलट शिवसेना शिंदे गटाने चांगली कामगिरी करत १८ जागा जिंकल्या.

बलाढ्य भाजपची मालेगावात ही अवस्था कशी झाली असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थितीत केला जात असताना भाजपचे नेते सुनील गायकवाड यांनी मालेगावातील पराभवाचे खापर पक्षातीलच काही नेते व कार्यकर्त्यांवर फोडत संताप व्यक्त केला आहे. भाजपचा पराभव केवळ गद्दारांमुळे झाला असून पक्षद्रोह करणाऱ्या सापांना ठेचून काढले जाईल, त्यांच्या चुकीला माफी नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. गायकवाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घेतला त्यात हे आरोप केले.

Malegaon municipal election, devendra fadnavis
Nashik NMC : नाशिकमध्ये स्वीकृतसाठी जोरदार लॉबिंग; सहा, दोन, एक-एक च्या फॉर्म्युल्याची चर्चा, पण..

सुनिल गायकवाड हे भाजपचे माजी महानगरप्रमुख आहेत. ते मालेगाव महापालिकेत सलग २० वर्ष नगरसेवक होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला. सुनिल गायकवाड यांचे बंधू मदन गायकवाड व प्रवीण गायकवाड हे दोनच भाजपचे उमेदवार मालेगावात निवडून आले आहेत. पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवानंतर गायकवाड यांनी फेसबुकपोस्ट करुन खदखद व्यक्त केली होती. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था..’अशी भावना त्यांनी या पोस्टमध्ये मांडली होती. त्यातून भाजपमध्ये सारे काही अलबेल नव्हते हे स्पष्ट होतं.

Malegaon municipal election, devendra fadnavis
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात बोलताना पक्षातील गद्दारांनी पक्षाची रणनिती दादा भुसेंना सांगण्याचे पाप केल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षातील काही लोकांनी सुपारी घेऊन विरोधातील उमेदवारांना मदत केली. अशा फितुरांना आता माफी नाही अशा अस्तनीतल्या सापांना ठेचून काढले जाईल असा इशारा गायकवाड यांनी दिला. आपल्या फायद्यासाठी दादा भुसे यांनी त्यांची काही माणसे भाजपमध्ये पेरली आहेत. भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा वापर त्यांनी निवडणुकीत केल्याचा आरोप गायकवाड यांनी भुसे यांच्यावर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com