Eknath Khadse, Chandrakant Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : निखिल खडसेंच्या मृत्यूवर बोट, आमदार चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंना निर्वाणीचा इशारा

Chandrakant Patil Warns Eknath Khadse On Nikhil Khadse's Death : एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीविषयी वक्तव्य केल्याने आमदार पाटील चांगलेच भडकले, त्यांनी निखील खडसेंच्या मृत्यूचा विषय बाहेर काढला.

Ganesh Sonawane

Jalgaon Political News : मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद आता कौटुंबिक पातळीवर घसरला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी नगराध्यक्ष आहे, एकही दिवस नगरपंचायतीला दिसत नाही असा आरोप खडसेंनी केला होता. एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेनंतर आमदार पाटील चांगलेच भडकले असून त्यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूवर बोट ठेवत खडसेंना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. माझ्या मुलीविषयी का बोलत आहात? तुम्हालाही मुली आहेत, जरा भान ठेवा. याद राखा कुटुंबावर जात असाल तर, मी कौटुंबिक वादात घुसलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना दिला आहे.

पाटील म्हणाले, नगपालिकेत माझ्या मुलीला मी निवडणुकीत उभं केलं कारण लोकांचा आग्रह होता. त्यामुळे मुलीचा नकार असनाही मी तिला निवडणुकीला उभं केलं. खडसे आम्हाला आमच्या घरात बघायला सांगतात, पण तुमच्या मुलाने निखिलने का जीवन संपवलं? एका मंत्र्यांने सांगितलं होतं, मी ज्यावेळेस गौप्यस्फोट करेल, तेव्हा खडसेंना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असं तुमच्या मुलाने काय बघितलं की त्याला जीवन संपवावं लागलं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत केला. आम्ही कुटुंबात घुसायला गेलो तर खूप काही निघेल पण आमची ती संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. खडसे म्हणाले, माझ्या मुलाचा निखील खडसेंचा मृत्यू झाला तेव्हा दोन दिवस आधीच मी बाहेर गावी होतो. मी बाहेरगावी असताना मला बातमी समजली. आमदारांना निखिलच्या मृत्यूवर आजूनही शंका असेल तर त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करावी. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे खडसे म्हणाले.

नगराध्यक्ष कुठेय सांगा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा'

नगराध्यक्ष कुठेय सांगा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा' असे आवाहन करत एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना व त्यांच्या मुलीला लक्ष्य केलं. नगराध्यक्ष कुठे आहे, भुसावळला आहे की मुक्ताईनगरमध्ये की आणखी कुठल्या गावात आहे, हे विचारण्याचा मला नागरिक म्हणून अधिकार असल्याचं खडसे म्हणाले.

आमदार पाटल्यांच्या कुटुंबाबाबत माझ्याकडेही बरीच माहिती आहे. ते सध्या घरच्या समस्यांमुळे उदिग्न आहेत. तुम्ही बाकीच्या गोष्टी काढाल, तर मीही काढणार असा इशारा खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे खडसे विरुद्ध पाटील असा वाद दिवसेंदिवस वाढत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. परिणामी मुक्ताईनगरचे राजकारण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT