MLA Suresh Dhas meets Managing Director Deepa Mudhol Munde in Pune, demanding centralized kitchen and better welfare schemes for sugarcane cutting workers. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suresh Dhas : सुरेश धस यांनी घेतली IAS दीपा मुधोळ मुंडेंची भेट : ऊसतोड कामगारांसाठी मागण्यांची यादीच दिली

Sugarcane Workers Welfare Maharashtra : बीडचे आमदार सुरेश धस यांनी ऊस तोड कामगारांसाठी गळीत हंगामात सेंट्रलाइज किचन, आरोग्य सुविधा, विमा व आर्थिक मदत योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली.

Sampat Devgire

Beed Politics News : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. बीड जिल्हा हा राज्यभरात ऊस तोड कामगारांचा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस यांनी नुकतीच ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांची सामाजिक न्याय भवन, पुणे येथे भेट घेतली.

नुकताच त्यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. 2022 मध्ये राज्य शासनाने ऊस तोडणी कामगारांसाठी या महामंडळाची घोषणा करून ते कार्यान्वित केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देणे, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा व वसतिगृह उपलब्ध करून देणे, अपघाती विमा योजना, गळीत हंगामात ऊस तोडणी कामगारांच्या बैलांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान देणे, तसेच महिला कामगारांसाठी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी धस यांनी केली.

गर्भधारणेच्या कालावधीत महिला कामगारांना सकस आहार, तसेच गळीत हंगामाच्या काळात सेंट्रलाइज किचनच्या माध्यमातून मजुरांना सकाळी जेवणाचा डबा (बांधकाम कामगारांच्या धर्तीवर) देण्यासारख्या योजना राबविण्याची गरज असल्याचे मतही धस यांनी व्यक्त केले. त्यामुळे कामगारांचे आरोग्य सुधारण्यास आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल.

मागील दोन ते तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील अनेक ऊस तोडणी कामगार इतर जिल्ह्यांमध्ये गळीत हंगामासाठी गेले असताना त्यांच्या बैलांचे अपघाती मृत्यू व अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र संबंधित कामगारांना अद्याप विमा व सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कारखाना परिसरात किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झालेल्या 50 हून अधिक कामगारांच्या कुटुंबीयांनाही अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याचा मुद्दा धस यांनी उपस्थित केला.

त्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी, याशिवाय या कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून मागील दोन ते तीन वर्षांत वसतिगृह बांधकाम, मध्यवर्ती कार्यालय, विभागीय कार्यालयांची दुरूस्ती, पाणी फिल्टर, ओळखपत्र वितरण, 'आनंदाचा शिधा'वाटप आदी विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत.

या कामांची सद्यस्थिती काय आहे, ती प्रत्यक्षात कार्यान्वित झाली आहेत का ? याबाबत विचारणा केली. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून दीपा मुधोळ मुंडे यांनी पुढील काळात ऊस तोडणी कामगारांसाठी पथदर्शी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT