

Beed News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यासह देशभरात उमटले होते. त्यानंतर या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे हे आरोपी तुरुंगात आहे. तर यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे गुरुवारी (13 मार्च) भावाच्या बाराव्याच्या धार्मिक विधीकरिता तुरूंगातून बाहेर आला होता. याचदरम्यान, बीडमधील केजमध्ये एक मोठं कांड समोर आलं आहे.
बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेच्या टोळीनं गुरुवारी (ता.12) दुपारी संग्राम चाटे या तरुणाला अडवत त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, यावरच न थांबता आरोपींनी कत्ती आणि लोखंडी रॉडनं या तरुणावर हल्ला चढवला.
संग्राम चाटे या तरुणाला मारहाण करताना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचं नाव घेत धमकावल्याचंही समोर येत आहे. आरोपींनी यावेळी तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो असंही म्हटलं.
संग्राम चाटे या तरुणावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाटे याच्यावर गंभीररित्या जखमी झाला असून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी जयराम चाटे एक दिवसासाठी जेलच्या बाहेर येण्याआधीच त्याच्या टोळीतील सदस्यांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली.
संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वाल्मिक कराडसह अनेक आरोपी तुरुंगात आहे. याच आरोपींपैकी तब्बल 14 महिन्यानंतर जयराम चाटे हा अवघ्या काही मिनिटांसाठी तुरूंगाबाहेर आणण्यात आलं होतं. चाटे हा दुपारी 12.43 पासून ते 1.22 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात भावाच्या बाराव्याच्या धार्मिक विधीसाठी उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर जयराम चाटेला पुन्हा तुरूंगात नेण्यात आलं.
सरपंच संतोष देशमुख यांचं केज मांजरसुबा टोल नाक्याजवळून 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं केज मांजरसुबा टोल नाक्याजवळून अपहरण करण्यात आलं आणि केजमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासह काही लोकांनी त्यांना मारहाण केली. वाल्मिक कराडच्या लोकांनी संतोष देशमुखांना क्रूरपणे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच आरोपी जवळपास सात ते आठ जण गॅसपाईप, लोखंडी रॉडनं संतोष देशमुखांना दोन तासभर मारत होते. लाकडी दांड्याला तारा गुंडाळून त्यांनी देशमुखांना मारहाण केली एवढ्यावरच त्यांचं समाधान न होता आरोपींनी देशमुखांच्या तोंडावर लघवी देखील केली, त्यांच्या छातीवर उड्या मारल्या. संतोष देशमुख पाण्यासाठी तडफडत होते, हात जोडून माफी मागत होते, तरीही त्यांना मारहाण करणे सुरूच होतं. अखेर यानंतर संतोष देशमुखांनी आपला जीव सोडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.