Eknath-Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse Politics: रस्त्यांच्या प्रश्नावर खडसेंनी सरकारला धारेवर धरले, ग्रामीण भागातील मतदार तुम्हाला मत देत नाही का?

Mumbai BJP Government NCP Leader Eknath Khadse Criticizes on poor Roads in Rural -एकनाथ खडसे यांनी विचारले, ग्रामीण महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर सरकारचे चांगलेच वाभाडे काढले.

Sampat Devgire

Khadse Vs BJP News: समृद्धी महामार्गाची सातत्याने चर्चा होत असते. राज्य शासनाकडूनही त्याचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होतो. मात्र याच प्रश्नावरून एकनाथ खडसे यांनी सरकारला कोंडीत पकडले.  

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. महाराष्ट्र शासनाने रस्त्यांच्या दुरुस्ती आणि दुरावस्थेबाबत काहीही उपाय केले नाही. असा गंभीर आरोप या अधिवेशनात झाला. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले. सणाकडून मुंबई आणि अन्य शहरातील रस्त्यांबाबत घोषणा होत असतात. त्यामध्ये ठराविक भागालाच सुविधा दिल्याचा आरोप झाला. 

महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग झाला आहे. हा एक चांगला रस्ता शासनाने दिला. शक्तीपीठ महामार्ग देखील याच प्रकारातला आहे. मात्र अन्य रस्त्यांचे काय? असा प्रश्न खडसे यांनी केला. 

केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून राज्यात महामार्गाची विविध कामे झाली. त्यांच्या माध्यमातून झालेल्या या कामांशिवाय राज्याला अन्य कोणते रस्ते मिळाले. याबाबत सरकार काय करीत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे, असे खडसे म्हणाले.

राज्य शासनाकडून सर्वप्रमुख रस्ते आणि मोठ्या योजना मुंबई, नवी मुंबई अशा मोठ्या शहरांमध्येच राबवल्या जातात. एखादा चांगला रस्ता ग्रामीण भागातही का केला जात नाही?. आज ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी सरकारकडे निधी नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. 

निधीचे कारण पुढे करून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त केले जात नाही. रस्त्यांचे अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात नवी कामे करण्यात येत नाहीत. 

या कंत्राटदारांनी रस्त्याची कामे केली आहेत त्यांना पैसे मिळालेले नाहीत. हे कंत्राटदार प्रचंड संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये कोणतेही रस्ते होत नाहीत. राज्य शासन यासंदर्भात काय विचार करीत आहे? कोणते नियोजन करणार आहे? कोणतेही धोरण सध्यातरी सरकारकडे दिसत नाही. 

सर्व महत्त्वाचे आणि मोठे प्रकल्प शहरी भागात केले जातात. ग्रामीण भागात जनावरे राहतात का? माणसे राहत नाहीत का? ग्रामीण भागातील लोक तुम्हाला मतदान करीत नाहीत का? अशी प्रश्नांची सरबत्ती एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर केली. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT