Ahilyanagar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis And Ahilyanagar Politics : देवाभाऊंसोबतचा खास फोटो की, सूचक मेसेज? तीन युवा नेत्यांच्या विधिमंडळातील 'टायमिंग'ने वाढवली राजकीय कुजबुज!

Mumbai Budget Session, NCP MLA Ashutosh Kale with CM Devendra Fadnavis, Nashik Graduate Constituency MLA Satyajeet Tambe, BJP leader Vivek Kolhe sparks political buzz : अहिल्यानगरमधील आमदार सत्यजीत तांबे, आमदार आशुतोष काळे आणि युवा नेता विवेक कोल्हे यांचा एकत्रित फोटो समोर आल्याने अनेक राजकीय अंदाजांना उधाण आलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai Budget Session : अहिल्यानगरचं सहकारचं राजकारण कोणत्या वळणावर जाईल याचा नेम नाही. या राजकारणाचा तळ अहिल्यानगरमध्ये सापडत नसला, तरी मुंबई मात्र हा तळ ढवळून काढताना दिसते. अहिल्यानगरच्या राजकारणात नेमकं काय चाललं आहे, हे मुंबईने सांगितलं आहे.

अहिल्यानगरचे तीन युवा नेते एकत्र आल्याचे फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हे तिघे युवा नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात फाॅलो करतात. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात या तीन युवा नेत्यांच्या टायमिंगवर राजकीय कुजबुज वाढली आहे.

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेतचा फोटो कोपरगावमधील अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. देवाभाऊ पुढे आहेत, अन् त्यांच्यामागे आमदार काळे उभे आहे. अजितदादा असताना, काळेंसाठी तेच सर्वकाही होते. पण, आता ते नाहीत. कामे मार्गी लावायची म्हटल्यावर पुढं चालावाच लागतं. अजितदादांना पर्याय आता थेट देवाभाऊ!

याचवेळी दुसरा फोटो देखील समोर आला आहे. हा फोटो देखील मुंबई विधिमंडळ परिसरातला असावा, असा अंदाज आहे. यात नाशिक पदवीधर मतदार संघाचे संगमनेरमधील (Sangamner) आमदार सत्यजीत तांबे मध्यभागी असून, त्यांच्या उजव्या बाजूला आमदार आशुतोष काळे आणि डाव्या बाजूला भाजपचे अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे आहेत. हे तिघेही हास्यविनोद करताना फोटोत दिसत आहे.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या बदलेल्या मार्गाविरोधात जनआंदोलन उभारलं आहे. विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित करताच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा समिती नेमून आणखी पर्यायी मार्गाची चाचपणी करण्याची घोषणा केली. सत्यजीत तांबे यांचा राजकीय वारसा काँग्रेस नेते, त्यांचे मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि वडील माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांच्याकडून येते असला, तरी त्यांनी नाशिक पदवीधरची निवडणूक अपक्ष लढवली. या निवडणुकीत देवाभाऊचं, पर्यायानं भाजपचं त्यांना बळ मिळाल्याची चर्चा असते.

तांबेंनी वाढवली राजकीय उत्सुकता

यामुळे राजकारणात आमदार तांबे हे देवाभाऊ यांना खूप फाॅलो करतात. या अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार तांबे यांनी देवाभाऊच्या विविध मुद्यांवर वैयक्तिक गाठी भेटल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे. तसंच आमदार तांबे यांनी पत्नी मैथिली तांबे यांना संगमनेर नगरपालिकेवर नगराध्यक्ष करताना एकहाती सत्ता घेत पकड मजबूत केली आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार तांबे आणि त्यांचे मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राजकीय वाटचालीची उत्सुकता असणार आहे.

शिंदेंच्या शिलेदाराबरोबर फाईट

कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे, भाजपसाठी हक्काचं राजकीय कार्ड आहे. त्यांनी राजकीय पुर्नवसनाची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला त्यांनी महायुतीमुळे माघार घेतली. परंतु नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांना चांगलेच झुंझावले. यामुळे विवेक कोल्हे चांगलेच चर्चेत आले.

विवेक कोल्हेंना राजकीय पुर्नवसनाची चाहूल

नगरपालिका निवडणुकीत आमदार आशुतोष कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांचे आव्हान असतानाच, ते लीलया परतावून लावले. कोपरगाव नगरपालिकेवर एकहाती सत्ता आणली आणि मुख्यमंत्री देवाभाऊची विजयाची सभा फिक्स केली. आता विवेक कोल्हे यांना राजकीय पुर्नवसनाची चाहूल लागली आहे.

कोल्हे भाजपच्या 'गुड बुक'मध्ये...

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसंच राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. तिथं विवेक कोल्हेंना फिक्स संधी असल्याचे सूत्रांची माहिती आहे. तसंच विवेक कोल्हे आणि त्यांचा परिवार देवाभाऊंसह भाजपच्या 'गुड बुक'मध्ये आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांना नेमकी कोठे राजकीय संधी मिळते याची उत्सुकता आहे.

मतदारसंघासाठी एकत्र या अन्..!

सत्यजीत तांबे यांच्याबरोबर आमदार काळे आणि कोल्हे एकाच फोटोत आल्याने, हास्यविनोदात रंगल्याने चर्चांना उधाण आलं आहे. काळे-कोल्हे राजकीय विरोध स्थानिक पातळीवर एकत्र नसले, तरी मुंबईत एकत्र येऊन मतदारसंघासाठी विकास कामांवर भर देत असतील, तर त्याचे स्वागत असेल, असे काही जाणकारांनी या फोटोवर म्हटलं आहे.

विखे-थोरातांभोवती राजकारण

तसं पाहिल्यास, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतंत्र ओळख आहे. या दोघा नेत्यांभोवतीच अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारणात फिरतं. थोरात अन् कोल्हे यांची राजकीय जवळीक आहे. तशी मंत्री विखे पाटील आणि काळे यांची राजकीय जवळीक दिसते. परंतु मंत्री विखे पाटील आणि कोल्हे यांचे स्थानिक राजकारणात राजकीय पटताना दिसत नाही. त्याचपद्धतीने थोरात आणि काळेंचे राजकीय गणित जुळताना कधी अहिल्यानगरकरांनी अनुभवले नाही.

राजकीय कुजबुज

पण हे तीन युवा नेते मुंबई विधिमंडळ परिसरात एकत्र आल्याने, अन् हास्यविनोदात रंगल्याने आणि हा फोटो समाज माध्यमांवर समोर आल्याने अहिल्यानगरमधील अनेक राजकीय धुरांमध्ये फोटोवरून कुजबुज सुरू झाली आहे. पण राजकीय अंदाज हे अंदाज असतात. जेव्हा घडामोडी घडेल, तेव्हा राजकारण समजते. तोपर्यंत फक्त आखाडे बांधले जातील. सध्या तरी, तसंच काहीसे, हे फोटो सांगताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT