Minister Dada Bhuse
Minister Dada Bhuse  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: मुंबई महामार्गाची ८ दिवसांत दुरुस्ती करा

Sampat Devgire

नाशिक : मुंबई-आग्रा (Mumbai Agra Highway) महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी (Repairing) व दुरुस्तीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवारी दिले. गेले काही दिवस हा विषय गंभीर बनला आहे. यासंदर्भात नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. (National Highway pits issue took serious mode)

शासकीय विश्रामगृहात महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील यांच्यासमावेत श्री. भुसे यांची बैठक झाली.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे तातडीने भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा. जनभावना तीव्र असून, टोल बंदची मागणी नागरिक करू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची राहील.

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपूल यांचाही प्रस्ताव तातडीने करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना या वेळी देण्यात आल्या. नाशिक शहरातून जाणाऱ्या महामार्गाचीही डागडुजी व दुरुस्ती तातडीने करण्यासंदर्भात सूचना या वेळी देण्यात आल्या.

नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात डागडुजी व दुरुस्तीची कामे पूर्ण होणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्या. आठ दिवसांत डागडुजी व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास येतील याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी या वेळी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT