Important: टोलनाक्यावर ७ मिनिटांची मुदत, अन्यथा टोल देऊ नये?

छगन भुजबळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी मागितली ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत.
Chhagan Bhujbal with National highway officers
Chhagan Bhujbal with National highway officersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : टोल नाक्यासंबंधी (Toll Plaza) काही तक्रारी असल्यास १०३३ या हेल्पलाईनवर (helpline) तक्रार देता येते. याशिवाय टोल नाक्यावर पाच ते सात मिनिटांच्या पुढे वाहने थांबणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वेळ लागत असल्यास वाहने मोफत सोडा, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. (There is a directives of Centre agencies on Toll plaza time limit)

Chhagan Bhujbal with National highway officers
आमदार किशोर पाटील देणार हजार तरुणांना रोजगार देणार!

यासंदर्भात टोलनाक्यावर किती दूर वाहनांची रांग असावी, रांग अधिक असल्यावर मोफत सोडावे असा काही नियम आहे काय? अशी विचारणा श्री. भुजबळ यांनी केली. त्यावर श्री. साळुंखे यांनी नियम आहे, परंतु केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना नाही आणि महामार्गावरील वाहनांची संख्या ६० हजाराच्या पुढे जाते, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता श्री. साळुंखे यांनी दिली.

Chhagan Bhujbal with National highway officers
जनतेचे राजे व्हायचे आहे, त्यासाठी शिंदेंबरोबर गेलो!

ही सूचना टोलनाक्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. साळुंखे यांनी दिली. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिक ते इगतपुरी दरम्यानच्या खड्यांमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मदत देण्याची सूचना श्री. भुजबळ यांनी केली. त्यावर श्री. साळुंखे यांनी तसा प्रस्ताव पाठवण्याची तयारी दर्शवली.

गडकरी अन पवारांचे घ्यावे सहकार्य

विमानसेवा बंद पडल्याने विकासाला खीळ बसणार आहे, याविषयीचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर श्री. भुजबळ म्हणाले, की महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाला आहे. रोज कंपन्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कितीही इच्छा असली, तरीही त्यांची शक्ती कमी पडते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जावे. महाराष्ट्राच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करावा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, उद्योजक मनीष रावत, शहराध्यक्षा कविता कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अमोल नाईक, अमर वझरे, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, संतोष भुजबळ, नाना पवार, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com