Bhaskarrao-Bhagare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Economic package for Maharashtra: खासदार भास्कर भगरे यांची निर्मला सीतारमण यांच्याकडे धाव, नाशिकच्या या प्रकल्पांसाठी मागितले पॅकेज!

Mumbai Maharashtra Economic Survey NCP MP Bhaskar Bhagre demands package from the center-महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहता हाती घेतलेल्या प्रकल्पंसाठी डबल इंजीन सरकारने राज्याला मदतीचा हात देण्याची मागणी

Sampat Devgire

Bhaskar Bhagre News: राज्यात महायुतीचे सरकार आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष अर्थात डबल इंजीन सरकार आहे. मात्र सत्ताधारी भाजपचे खासदारांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रीया दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे मात्र राज्यासाठी धाऊन आले आहेत. 

केंद्र आणि राज्य दोन्हींचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने विविध योजना तसेच राज्य सरकारांना मदतीचा हात दिला आहे. त्यादृष्टीने देशातील लक्षणीय अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रातील भाजप सरकारलाही मदत देण्याची मागणी झाली आहे.  

यासंदर्भात महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडे विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांनी केली आहे. राज्यात सध्या एकाच वेळी अनेक प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प सुरू रहावेत यासाठी ही मागणी केली.  

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक सहाय्य व विकास पॅकेज जाहीर करावे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची खासदार भगरे यांनी भेट घेतली. त्यांना पत्र देत राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा तपशील त्यात समाविष्य केला आहे.

शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ आणि २०२५-२६ आर्थिक वर्षात राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. एकूण राज्यांतर्गत उत्पादन सुमारे ४६ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आर्थिक वाढीचा दर ७ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. उद्योग, सेवा, व्यापार, वित्तीय क्षेत्र, परकीय गुंतवणूक आणि कर महसुलामध्ये महाराष्ट्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे.

मात्र या आर्थिक सर्वेक्षणात काही गंभीर आव्हाने देखील अधोरेखित करण्यात आली आहेत. राज्यावर सध्या ७ ते ८ लाख कोटी रुपयांपर्यंत सार्वजनिक कर्जाचा भार आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा, सिंचन व्यवस्था, कृषी मूल्यसाखळी आणि प्रादेशिक संतुलित औद्योगिक विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये विकासाच्या दृष्टीने अजूनही अनेक अडचणी आहेत. या भागात सिंचन सुविधा, दळणवळण व्यवस्था, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: नाशिकच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी वळवणे, सिंचनाच्या योजनांचा त्यात समावेष आहे.

खासदार भगरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख इंजिन आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व रोजगार क्षेत्र अधिक मजबूत झाल्यास त्याचा थेट फायदा संपूर्ण देशाच्या विकासाला होईल.त्यामुळे केंद्र सरकारने या प्रस्तावांचा सकारात्मक विचार करावा.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT