Narendra-Modi.jfif Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CJP Student Agitation: पंतप्रधान मोदी सरकारची पहिली पीछेहाट; 'कॉक्रोच' ने करून दाखवले, आता, ठाकरे बंधूंचा तिरंगी मोर्चा होणार की विजय सभा?

Mumbai Raj, Uddhav Thackeray, Tricolor Morcha, Dharmendra Pradhan's resignation, government bows down, will the morcha take place?-विरोधी पक्षांना बारा वर्षात जमले नाही ते विद्यार्थ्यांच्या दबावापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावे लागले.

Sampat Devgire

CJP Delhi News: गेल्या बारा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना नेहमीच कमी लेखले. प्रत्येक आंदोलन दुर्लक्षित केले. त्यांचे हे धोरण विद्यार्थ्यांच्या दबावापुढे चालू शकले नाही.

ठाकरे बंधूंचा तिरंगी मोर्चा उद्या मुंबईत निघणार होता. या मोर्चा बाबत राज्यातील सर्वच विरोधकांना उत्सुकता होती. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही त्यात सहभागी होणार होता.

या मोर्चा आधीच आज केंद्रात मोठी घडामोड घडली. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना पुढे केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा झाली आहे. हा सीजेपी आंदोलनाचा विजय मानला जातो.

केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारची ही पहिली पिछेहाट आहे. गेल्या बारा वर्षात अनेक आंदोलने आणि विरोधी पक्षांनी प्रखर शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र सरकार उघडपणे मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला आम्ही काँग्रेस सरकार नाही असे म्हणत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले धोरण कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलना पुढे बदलावे लागले. हा देशाच्या राजकारणातील महत्त्वाचा आणि नवे वळण देणारी घटना ठरली आहे. पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांपुढे झुकले असा संदेश यातून जाणार आहे.  

विशेष म्हणजे सोनम वांगचुक यांनी काल उपोषण मागे घेतले होते. त्याद्वारे केंद्र सरकारने आंदोलन निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा तो हेतू सफल झाला नाही. 

विशेषतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने हा विषय चांगलाच लावून धरला होता. आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र चव्हाण यांचे खाते बदलणार अशी चर्चा होती. त्याला राहुल गांधी यांनी तीव्र अक्षय नोंदवला होता. राजीनामा याशिवाय दुसरे काहीच मान्य नाही ही त्यांची भूमिका होती. 

आता या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा मुंबईतील उद्याचा तिरंगा मोर्चा होणार की नाही? याची उत्सुकता वाढली आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी आधीच या विद्यार्थ्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्या ते मोर्चा काढणार की विजय सभा घेणार याची उत्सुकता आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT