CJP Modi Government Meeting: सीजेपी अन् सरकारमधील 'हायव्होल्टेज' बैठक संपली, दोन मागण्यांबाबत सकारात्मक, प्रधानांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट

CJP News: दिल्लीसह देशभरात पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस विद्यार्थी,तरुणांचा प्रतिसाद वाढतो आहे. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
CJP spokesperson Saurabh Das, JP Nadda
CJP spokesperson Saurabh Das, JP NaddaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: दिल्लीसह देशभरात पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस विद्यार्थी,तरुणांचा प्रतिसाद वाढतो आहे. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. याचदरम्यान, केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची 1 तास बैठक बोलावण्यात आली होती. व्ही. हाऊसमध्ये तासाभरानंतर ही बैठक पार झाली. या बैठकीत काय चर्चा होते, आंदोलन मागे घेणार का, या बैठकीतून आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

सीजेपी आणि केंद्र सरकारसोबत शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सीजेपीकडून सौरव दास आणि आशुतोष रांका उपस्थित होते. तर सरकारकडून जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत सुमारे एक तासभर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतील सरकारसोबत काय चर्चा झाली याची माहिती सीजेपीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांसमोर दिली.

साैरभ दास म्हणाले, आम्ही सरकारचे प्रतिनिधी जे.पी.नड्डा, जितेंद्र सिंह यांच्यासमोर तीन मुख्य मागण्या मांडल्या. यात जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी एक कोटींची नुकसान भरपाई, तसेच आंदोलनादरम्यान तरुण आणि तरुणींवर दाखल झालेले 11 एफआयआर रद्द करण्याची मागण्यांचा समावेश होता. सरकार या दोन मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

तर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी मोदी सरकारसोबतच्या या बैठकीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. यानंतर सरकारकडून प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी शनिवारी दुपारी 2 पर्यंतचा वेळ मागितला असल्याचंही त्यांनी माध्यमांना सांगितलं.

CJP spokesperson Saurabh Das, JP Nadda
Jantar Mantar Protes: "तरुणांसोबत सबुरीने घ्या अन् चर्चा करा" : GenZ ने दणका दिलेल्या देशाचा मोदी सरकारला सल्ला

तसेच यावेळी सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींना जंतर मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्जबाबतची मोठी मागणी केली. त्यात त्यांनी या आंदोलनावेळी अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काहींना मुका मारही लागला आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर कारवाईची मागणी सीजेपीकडून यावेळी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com