Beed Ahilyanagar child labour action : बीड जिल्ह्यातील गहूखेल (ता. आष्टी) इथल्या सेवालाल तांड्यावर विविध घरांत आणि जनावरांच्या गोठ्यात काम करत असलेल्या 15 बालकामगारांची नुकतीच सुटका करण्यात आली. आता या प्रकरणात गंभीर माहिती समोर आली आहे.
या अल्पवयीन मुलांना दलालाने पैसे घेऊनच संबंधितांकडे कामासाठी पाठविल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्याचा जबाब जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी अंभोरा (ता. आष्टी) पोलिसांना दिला आहे. वसईच्या भाजप आमदार स्नेहा पंडित या मुद्यांवरून चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.
बीड (BEED) जिल्ह्यातील गहूखेल इथल्या सेवालाल तांडा इथं काही घरे आणि गोठ्यामध्ये नऊ अल्पवयीन मुली, सहा मुले काम करत असल्याचे अहिल्यानगर इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त व बाल संरक्षण अधिकारी यांच्या पथकाने 20 जूनला केलेल्या कारवाईतून समोर आले होते.
या प्रकरणी पोलिस (Police) उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे यांच्या फिर्यादीवरुन उत्तम शेठ, दिपक शेठ, संजू शेठ, संतोष शेठ, रमेश शेठ, विष्णू शेठ, दत्तू शेठ, किशोर शेठ आणि अशोक राठोड या संशयितांवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. बालकल्याण समितीच्या आदेशाने सुटका केलेली सहा मुले बीडच्या सरकारी बालगृहात, तर नऊ मुली आर्वी इथल्या मुलींच्या बालगृहात आहेत.
सुटका केलेल्या मुलांची भाषा अधिकाऱ्यांना कळत नव्हती. दरम्यान, वसईच्या आमदार स्नेहा पंडित यांनी विधिमंडळात याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. या मुलांची विक्री होऊनही पोलिसांनी किरकोळ कलमे लावल्याचे त्यांनी लक्ष वेधले. यानंतर जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनीही तसाच जबाब अंभोरा पोलिसांना दिला आहे. संबंधित मुले पुणे व रायगड जिल्ह्यातील असून मध्यस्थाने पैसे घेऊनच त्यांना कामासाठी पाठवल्याचे जबाबात नोंदवले आहे.
बाल कामगारांची मुक्तता करण्यासाठी बालकल्याण समिती, सहायक कामगार आयुक्त, पोलिस, स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत 20 जूनला अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात कारवाईची मोहिम हाती घेतली होती. अहिल्यानगर शहर, MIDC परिसरातून 15, तर बीड जिल्ह्यातून 15 बालमजुरांची सुटका केली होती. सुटका केलेल्या बालमजुरांचे आईवडिल देखील अजून सापडलेले नाही. कर्नाटक अन् महाराष्ट्रातील सीमाभागात बालमजुरांच्या दलालीचे प्रकार वाढल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.