Kirit Somaiya, Maulana Mufti & Mushtaq Dignity Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon vote Jihad: धक्कादायक, व्होट जिहादसाठी हिंदू लोकांनी पैसे खर्च केले का?

Mustkim Dignity: MIM MLA Maulana Mufti is Ajit Pawar's flattere & Rustic- ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती टक्केवारीसाठी अजित पवारांकडे हुजरेगिरी करतात?

Sampat Devgire

Mustkim Dignity News; मालेगाव शहरात सध्या व्होट जिहाद वरून जोरदार राजकारण सुरू आहे. यामध्ये समाजवादी पक्षाने या राजकारणाची अक्षरश: चिरफाड केली. मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती आणि अन्य नेते या प्रकरणात सत्ताधारी भाजपच्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप केला.

भाजप नेते किरीट सोमय्या वरचेवर मालेगावला येत असतात. त्यांनी व्होट जिहाद साठी मालेगाव शहरात पैसे आल्याचा आरोप केला होता. त्याला माजी आमदार आसिफ शेख यांनी दुजोरा दिला होता. शहराचे आमदार मौलाना मुफ्ती यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही, अशी टिका होत आहे.

मालेगाव शहरातील आमदार मौलाना मुफ्ती आणि त्यांचे विरोधक माजी आमदार असिफ शेख हे दोघेही या प्रश्नावर संशयास्पद भूमिका घेत आहेत. असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे नेते मुश्तकीम डिग्निटी यांनी केला आहे. माजी खासदार सोमय्या, माजी आमदार शेख आणि विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती हे एकच आहेत. ते जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

माजी खासदार सोमय्या आणि आमदार मौलाना मुफ्ती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी आमदार आसिफ शेख हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. आमदार मौलाना यांना टक्केवारी आणि कमिशनसाठी निधी मिळावा, म्हणून ते देखील अजित पवार यांच्यापुढे लाळघोटेपणा करीत आहेत. असे त्यांनी सांगितले.

मुश्तकीम डिग्निटी यांनी या विषयावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मालेगाव शहरात जे पैसे आले त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले ते सर्व हिंदू लोक आहेत. ही बाब आमदार मौलाना, रशीद शेख आणि किरीट सोमय्या का लपवत आहेत. या सर्व हिंदू लोकांची नावे घेऊन जनतेला योग्य माहिती का दिली जात नाही.

किरीट सोमय्या आणि अन्य नेते मालेगाव शहरात व्होट जिहाद झाले, असे म्हणतात. असे असेल तर हिंदू लोकांनी मुस्लिम लोकांचे मतदान करून घेण्यासाठी व्होट जिहाद घडवले का? असा गंभीर प्रश्न त्यांनी केला. मौलाना मुफ्ती हे अडाणी आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मालेगावच्या जनतेला काहीही न्याय मिळू शकत नाही.

मालेगावची जनता धार्मिक कट्टरतेमुळे पंधरा वर्षे अशा अडाणी लोकप्रतिनिधीला निवडून देत आहे. त्यामुळे या शहराचे नुकसान होत आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांना जाणीवपूर्वक आणि कारस्थान करून अधिवेशनात निलंबित केले. अन्यथा त्यांनी या प्रश्नावर अतिशय जोरकसपणे आवाज उठविला असता. मालेगावला न्याय मिळाला असता असे डिग्निटी म्हणाले.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT