BJP Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll : 'मविआ'च्या दुटप्पीपणावर विखे पाटलांचा हल्ला; ''राजकारण', 'षडयंत्र' आमच्या परिवारानं पत्करलेलं'

BJP Sujay Vikhe reacts to MVA decision of not fielding a candidate in Baramati while announcing a nominee for Rahuri bypoll : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 'मविआ'ने दिलेल्या उमेदवारीवरून भाजप माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Rahuri Bypoll 2026 : राहुरी पोटनिवडणुसाठी 'मविआ'ने, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला आहेत. पण बारामतीमध्ये दिलेला नाही. यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, शरद पवार यांच्या राजकारणावर हल्ला चढवला.

"अशा प्रकारचं राजकारण, षडयंत्र, हे आमच्या परिवारानं अनेक वर्षे पत्करलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत," असे सुजय विखे पाटील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सुजय विखे पाटील यांच्यावर पक्षाने जबाबदारी देतानाच, केरळम् विधानसभा निवडणुकीची देखील जबाबदारी दिली. केरळम् विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर, सुजय विखे पाटील आता राहुरी पोटनिवडणुकीत लगेचच सक्रिय झाले आहेत.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी राहुरी पोटनिवडणुकीत सक्रिय होताच, "'मविआ'च्या दुटप्पीपणावर हल्ला चढवला. ते म्हणाले, मला वाटतं की, हे राजकारण बरचं जुनं अन् यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडत आलेलं आहे. 'मविआ' बारामतीसाठी सर्व करू शकते, तर ती राहुरीसाठी का नाही? शेवटी दोन्ही परिस्थिती एकसमान होत्या."

'अजितदादा यांचे नेतृत्व सक्षम होतं. अजितदादा सहा-सात टर्म झाले होते. शिवाजी कर्डिले साहेब देखील सहा टर्म आमदार राहिलेले व्यक्तिमत्व आहे. पण माझ्यासाठी हे काही नवं नाही. अशा प्रकारचं राजकारण, षडयंत्र, आमच्या परिवारानं अनेक वर्षे पत्करलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत. 'मविआ'ने राज्यस्तरावर दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असतील, या गोष्टी मागे ठेवून आमच्या उमेदवारासाठी आम्ही ताकद लावणार आहोत,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

प्राजक्त तनपुरेंचे मानले आभार

सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं. "'मविआ'मध्ये उमेदवारी निश्चित केली. उमेदवार दिला आहे. मला असं वाटतं की, प्रत्येक उमेदवार सक्षम असतो. कोणालाही कमी लेखत नाही. निवडणूक ही निवडणूकसारखी करावी लागते. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मनतो. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत, शिवाजी कर्डिले यांच्याविषयी भावना व्यक्त केली. यातून तनपुरेंनी ते संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, हे सिद्ध केलं आहे," असे विखे पाटील यांनी म्हटलं.

बारामतीपेक्षा अहिल्यानगरमध्ये चांगली परिस्थिती

लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. बारामतीपेक्षा अहिल्यानगरमध्ये चांगली परिस्थिती आहे. अहिल्यानगरमध्ये सात अर्ज आहेत. बारामती जवळपास 21 ते 22 अर्ज आहेत, याकडे सुजय विखे पाटील यांनी लक्ष वेधलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT