Maratha Vidya Prasarak Samaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Vidya Prasarak Samaj : मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा पेच; सत्ताधारी गटाला विरोधकांची मदत का घ्यावी लागली?

MVP's medical college land issue triggers a new political twist in Nashik : शासकीय जमिनीच्या मुदतवाढीचा प्रश्न ऐरणीवर; आमदार राहुल आहेर आणि अमृता पवार मुख्यमंत्री फडणवीसांकडे, मविप्रच्या राजकारणाला नवा टर्न

Sampat Devgire

Nashik education politics : राज्यातील रयत संस्थे खालोखाल नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा उल्लेख होतो. मात्र ही संस्था गेले काही दिवस विविध कारणांनी चर्चेचा विषय बनली आहे. आता संस्थेच्या राजकारणाला नवा टर्न मिळाला आहे.

संस्थेतील विद्यमान सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या सहकाऱ्यांकडून होणाऱ्या राजकीय चुकांमुळे कार्यकारी मंडळ यापूर्वीही अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने संस्थेच्या सत्ताधारी गटावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यातून सावरण्यासाठी ॲड. ठाकरे यांना बरीच धावपळ करावी लागली होती.

आता संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) अडचणीत आले आहे. संस्थेच्या शासकीय जमिनीचे नूतनीकरण करण्याचा विसर सत्ताधारी गटाला पडला. सत्ताधारी गटाची बिनधास्त कार्यशैली त्याला कारणीभूत ठरल्याची टीका होत आहे.

जागेला मुदतवाढ नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश आणि अन्य गंभीर समस्या निर्माण झाल्यावर कार्यकारी मंडळ खडबडून जागे झाले. मात्र राज्यातील ना सत्ताधारी गटाशी मैत्री नाविरोधकांशी जवळीक अशा कात्रीत ते सापडले.

त्यामुळे सत्ताधारी गटाला चक्क विरोधकांशी सलगी करण्याची वेळ आली. भाजपचे (BJP) आमदार डॉ. राहुल आहेर आणि आर्किटेक्ट अमृता पवार या त्यांच्या मदतीला गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत.

आमदार राहुल आहेर आणि आर्किटेक अमृता पवार या दोघांनी मुख्यमंत्र्यांकडे संस्थेच्या मदतीसाठी गळ घातली आहे. यानिमित्ताने समाजाची संस्था म्हणून विरोधक आणि सत्ताधारी व्यक्तिगत राजकारण बाजूला ठेवून एकत्र आल्याचे दिलासादायक चित्र देखील पहायला मिळाले आहे. मात्र त्यामुळे सत्ताधारी गट राजकीय दृष्ट्या चर्चेत आला आहे.

संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजासाठी प्रतिष्ठेचा आहे. ही संस्था जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मराठा विद्या प्रसारक समाज गेली अनेक वर्ष केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहिला आहे.

आता संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांची मदत अपरिहार्य होती. मात्र त्यासाठी संस्थेच्या सत्ताधारी गटाचे गेली चार वर्ष केलेले दुर्लक्ष त्यांना अडचणीत आणत आहे. त्यामुळे चक्क संस्थेच्या सभासदांत विशेष स्थान असलेल्या (कै.) डॉ. वसंतराव पवार यांची त्यांना आठवण झाली. विरोधकांना बरोबर घ्यावे, स्थिती निर्माण झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने सहमतीच्या राजकारण आणि कामकाजाची आठवण झाली. त्यामुळे गेले चार वर्षे सातत्याने विरोधकांवर टीकेचे बाण सुटत होते. आता संस्थेच्या हितासाठी दोन्ही गट एकत्र येणार का असा नवा राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT