Ajit Pawar, shutosh Kale sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Ncp Melava:'...आता अजितदादांना मुख्यमंत्री करू', विखे-पाटील गट सावध!

Ashutosh Kale : गेल्या वर्षी 2 जुलैला राजभवानात झालेल्या घडामोडी वेळी आमदार आशुतोष काळे हे परदेशात होते. त्यावेळी ते असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती.

Pradeep Pendhare

Nagar : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आशुतोष काळे (अजित पवार गट) आणि भाजपचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी जवळीक वाढली असल्याची चर्चा आहे. त्यात आमदार काळेंना मंत्री करणार असल्याचे सूचक वक्तव्य अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केले. तर अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहाण्यासाठी युवकांनी कामाला लागा, असे आमदार काळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी युवक मेळाव्यातील या निर्धारामुळे विखे-पाटील गट सावध झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात युवक मेळावा झाला. आमदार आशुतोष काळे(Ashutosh Kale ) अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. आमदार डाॅ. किरण लहामटे, नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, डाॅ. मच्छिंद्र बर्डे, सुनील गुंगले, अशोक आव्हाटे, चंद्रशेखर म्हस्के, रमेश गवळी उपस्थित होते. Nagar Ncp Melava

'गेल्या वर्षी 2 जुलैला राजभवानात झालेल्या घडामोडी वेळी आमदार आशुतोष काळे हे परदेशात होते. त्यावेळी ते असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती. तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे', असे सांगून काळे यांच्या मंत्रीपदाचे संकेत सूरज चव्हाण यांनी दिले. '2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आले. कोव्हिडमुळे विकासकामांना ब्रेक लागला. यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेअरिंगबाज भूमिका घेतली. यामुळे आमदार आशुतोष काळे यांना कोपरगावमध्ये विकासकामांना गती देता येत आहे', असे सुरज चव्हाण यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचे पाहायचे आहे. तसे राज्याच्या हितासाठी देखील गरजेचे आहे. या वर्षभरात लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी कामाला लागावे, असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT