NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल फेब्रुवारीत, असे आहे सुनावणीचे वेळापत्रक

Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवार गटाकडून आज विधानसभा अध्यक्षांकडे नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. काही आमदारांनी रात्री उशिरा त्यांची कागदपत्रे सादर केली.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आज (शनिवारी) विधानसभा अध्यक्षांच्या समोर होणारी सुनावणी आता मंगळवार (ता.23) पासून सुरू होईल. सुनावणीच्या वेळापत्रकानुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आमदार अपात्रते संदर्भात निकाल लागण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे-सरकारमधील तणाव वाढला? चर्चेकडे पाठ, नेमकं काय घडलं?

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आज विधानसभाध्यक्षांकडे नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. काही आमदारांनी (MLA) रात्री उशिरा त्यांची कागदपत्रे सादर केली. त्यामुळे आम्हाला ती सादर करण्यात उशीर झाला. आणि या कारणामुळे आम्ही अध्यक्षांकडे वेळ मागितला आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाकडून देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवीन सादर केलेल्या कागदपत्रांवर शरद पवार गटाकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो. 23 तारखेच्या सुनावणी दरम्यान या कागदपत्रांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 19 तारखेला 4 साक्षीदार यांची उलट तपासणी करण्यासाठी कागदपत्र दिली आहेत. याला आम्ही आक्षेप घेतला आणि वेळ वाढवून मागितला आहे, असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

सुनावणीचे वेळापत्र

23, 24 जानेवारीला उर्वरित 4 जणांची उलट तपासणी होणार

25 जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार

तीन दिवसांचा वेळ फायनल सबमिशनसाठी मिळणार

29 जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार

26, 27, 28 जानेवारीला लेखी उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल

29 आणि 30 जानेवारीला सुनावणी होईल

30 जानेवारीला अंतिम युक्तिवाद होणार

(वेळ: 11 ते 2 आणि 3 ते 6)

31 जानेवारीला सुनावणी संपवण्यात येईल.

सुनावणी संपल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com