Nagar urban bank sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar News :'भाजपच्या माजी खासदाराचा भ्रष्टाचार; उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंचा दबाव'

Devendra Fadnavis : गंभीर आरोप, प्रकरणाचा तपास तत्काळ विशेष पथकाकडे देण्याची

Pradeep Pendhare

Nagar : भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी हे नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन होते. ते चेअरमन असताना बँकेतील कारभारात भ्रष्टाचार झाला, असा गंभीर आरोप करत बँकेतील गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावी, अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिस महासंचालक रेश्मी शुक्ला यांना पत्र दिले आहे.

भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले आहेत. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तपासाला गती मिळून कारवाई होत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तपासावर दबाव येत असून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. हे वेळीच थांबायचे असल्यास या प्रकरणा तपास विशेष तपास पथकाकडे द्यावा, अशी मागणी राजेंद्र चोपडा यांनी पोलिस महासंचलकांकडे पत्राद्वारे केली आहे.

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी संबंधित संचालक, अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी चोपडा यांनी केली आहे. चोपडा यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाही देखील पत्र पाठवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भ्रष्टाचार करणारे नेत्यांसोबत

बँकेत अनेक गोरगरीबांचे पैसे अडकलेले आहेत. दुसरीकडे संबंधित संचालक, संशयित आरोपी नुकत्याच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी घेताना दिसले. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करीत होते,असा आरोप देखील पत्राद्वारे करण्यात आला आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT