Maratha Reservation : गावबंदी असतानाही चंद्रशेखर बावनकुळे गेले उमरखेडात अन‌्...

Chandrashekhar Bawankule : संतप्त मराठा आंदोलकांनी दाखविले काळे झेंडे
Protest in Umerkhed of Yavatmal.
Protest in Umerkhed of Yavatmal.Sarkarnama
Published on
Updated on

Yavatmal : भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा त्यावेळी चर्चेत आला, ज्यावेळी त्यांना संतप्त मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धावाधाव झाली.

उमरखेड येथे बुधवारी (ता. 20) बावनकुळे दौऱ्यावर आले होते. राजस्थानी भवन येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपची बैठक घेतली. त्यावेळी संधी साधत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी हा परिसर गाठला. बावनकुळे दिसताच त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे..’अशा घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

Protest in Umerkhed of Yavatmal.
Yavatmal : घाटंजी बाजार समितीत लिलाव बंद पाडण्याचा राजकीय डाव उधळला

उमरखेड येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. अशातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी उमरखेड परिसर गाठला. हिंगोली लोकसभाअंतर्गत उमरखेड, हदगांव, किनवट विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. येथील 100 भाजप वॉरीयर्सच्या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले. त्याच वेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांच्या रोषाला बावनकुळे यांना सामोरे जावे लागले.

घोषणाबाजी होताच राजस्थानी भवन येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे झटापटही झाली. काही क्षणातच पोलिसांनी पावले उचलत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 135 नुसार त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. सचिन घाडगे, सरोज देशमुख, प्रमोद देशमुख, गजानन देशमुख भांबरखेडे, नितीन शिंदे, गोपाल झाडे, वर्षा देवसरकर, बळीराम मुटकुळे, गजेंद्र ठाकरे अशी आंदोलकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी त्यांची मुक्तता करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यावर मराठा आंदोलक सचिन घाडगे म्हणाले की, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत उमरखेड येथे सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणीही गावबंदी मोडत उमरखेडमध्ये प्रवेश केला तर त्यांना अशाच परिणामांचा तोंड द्यावे लागले.

सरकारला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. आरक्षण न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. मराठा आंदोलनाची धग विदर्भात पोहोचल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात बसच्या जाळपोळीतून त्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर उमरखेडमध्ये गावबंदी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातही असाच निर्णय मराठा ग्रामस्थांनी घेतला. पातूर तालुक्यातील चरणगाव येथेही गावबंदी करण्यात आली. सध्याही येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Protest in Umerkhed of Yavatmal.
Yavatmal News : संजय राऊत आणखी अडचणीत; उमरखेडमध्ये गंभीर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com