Eknath Khadse 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagpur Riots : नागपूर दंगलीमागे मालेगाव 'कनेक्शन'? एकनाथ खडसेंचा गृहखात्याच्या अपयशावर हल्लाबोल

Jalgaon Eknath Khadse Nagpur riots political Maharashtra : नागपूरमधील दंगलीवर जळगावमधील नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर प्रतिक्रिया देताना महायुती सरकार सुनावलं.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : नागपूरमधील दंगलीवर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना, महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी दंगल पूर्व नियोजित होती, तर सरकार काय करत होते? असा सवाल करत हे गृहखात्याचे अपयश आहे. मालेगाव कनेक्शन असेल, तर ती गंभीर बाब आहे, आणि त्यात लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी भूमिका देखील एकनाथ खडसे यांनी मांडली.

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यावरून महायुती (Mahayuti) सरकारमधील प्रमुख पक्ष भाजपच्या समकक्ष असलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनांनी राज्यात 17 मार्चला आंदोलन केले. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कबर हटवण्याची मागणीने अधिकच जोर धरला. त्यातून नागपूर मध्ये दंगल उसळली.

नागपूरमधील (Nagpur) दंगलीचे पडसाद, संपूर्ण देशात पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीतील कोणत्याही आरोपींना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. या दंगलीवरून विरोधकांनी महायुती सरकारला, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेत घेरले. मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राऊंडवर दंगल झाली. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच टार्गेट केले. आता एकनाथ खडसे यांनी देखील या दंगलीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, "नागपूर येथील दंगल प्रकरणाची पोलिस विभागाकडून कसून चौकशी सुरू आहेत. शांतता प्रिय शहरात बाहेरून लोक येवून दंगल घडवली. यात मालेगाव कनेक्शन असेल, तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे". दंगल पूर्व नियोजित आहे, तर सरकार नेमकं काय करत होते?, असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी केला.

'सरकार सांगत असेल की ही दंगल पूर्व नियोजित आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉलीमधून दगड आणले होते, जर असं सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलिस यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस काय करत होते? हा मोठा प्रश्न आहे', असे म्हणत खडसेंनी महायुती सरकारला चांगलेच सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT