Ashish Shelar Taunt Raj Thackeray : ''ज्यांना विधानसभेत जाता येत नाही, ते विधानं करण्याच्या कार्यक्रमात बसतात'' ; शेलारांनी लगावला राज ठाकरेंना टोला!

Ashish Shelar News : जाणून घ्या, या आधी राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं, ज्यावर शेलारांनी अशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे.
Raj Thackeray, Ashish Shelar
Raj Thackeray, Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Ashish Shelar in Pune : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस आणि त्यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले चर्चेत आहे. याच खोक्या भोसलेच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यावर आता भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

मनसे(MNS) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी ''एका खोक्या भाईला काय घेऊन बसलात विधानसभेत सगळे खोके भाईच भरले आहेत,” असा टोला लगावला होता. त्यावरती प्रतिक्रिया देताना आशिष शेलार यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशान साधताना आमदार निवडून आणता आला नाही म्हणून ते असे विधान करत असल्याचा टोला लगावला आहे.

Raj Thackeray, Ashish Shelar
Anjali Damania : अंजली दमानियांचे CM देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज; म्हणाल्या, 'हिम्मत असले तर...'

पुणे दौऱ्या दरम्यान आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अशी शेलार म्हणाले, आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी एखादं वक्तव्य करणं आणि आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे संबंध महाराष्ट्राला आता कळून चुकलं आहे. ज्यांनी जनतेचे काम केलं त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले असून ते विधानसभेत बसले आहे. मात्र ज्यांना निवडून येता येत नाही तसेच जनता निवडून देत नाही. ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत.'' असा टोला आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावल्याचे दिसून आले.

Raj Thackeray, Ashish Shelar
Disha Salian Death Case : आदित्य ठाकरे आणि गँग हे...! दिशा सालियन केसमधील वकिलांचे मोठे विधान

आशिष शेलार पुढे म्हणाले, सुरेखा पुणेकर यांनी कला केंद्राच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार सुरू असल्याची तक्रार माझ्याकडे केली आहे. एका जिल्ह्यातील सांस्कृतिक केंद्राबाबत ती तक्रार दिली आहे. जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आणि विदारक आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या कलेक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील की अशा प्रकारच्या कला केंद्रांचा उपयोग हा लोककलांचा प्रचार करण्यासाठी व्हावा ते सोडून इतर प्रकार होत असतील तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असं अशी शेलार म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com