Nana Patole
Nana Patole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole News; ‘ईडी’ च्या धाकाने काँग्रेस सोडून पळालेल्यांना विसरा

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) ‘ईडी’ च्या (ED) धाकाने पक्ष (Congress) सोडून पळून गेलेल्यांना विसरून जा, जो देशासाठी लढेल, संविधानासाठी लढेल व काँग्रेससाठी लढेल त्यांच्या पाठीशी पक्ष आहे. आज जे युवक पक्षात सक्रीय आहेत तेच उद्याचे नेतृत्व असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज येथे केले. (Todays active youth in congress is afuture of Party)

नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी ते नाशकि दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ब्रिटिशांनी दिलेले भूक, भय व भ्रष्टाचार हेच आता भाजप देत असून मूठभर श्रीमंत लोकांसाठी केंद्र व राज्य सरकार ने निर्माण केलेली परिस्थिती बदलण्यासाठी हातसे हात जोडो उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देश जोडण्याचे काम करायचे आहे.

ते म्हणाले की, कृत्रिम महागाई निर्माण करून देश महागाईकडे ढकलला जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महागाई वाढू दिली गेली नाही. ४३ हजार कोटींचे कर्ज होते, मात्र ते कर्ज देशाला पुढे नेण्यासाठी होते. मात्र मागील आठ वर्षांच्या काळात एक लाख ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज देशावर झाले आहे. सार्वजनिक उपक्रम विकून देश चालविला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या चौदा हजार शाळा बंद करून गरिबांची शिक्षण बंद केले जात आहे. देशात सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्र राज्यात आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी संसदेचे अधिवेशन देखील कोरोना काळात सुरू ठेवले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना रेमेडीशिवरचा काळाबाजार करणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. मात्र त्यावेळचे विरोधी पक्ष नेत्यांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हेगारांना सोडविण्याचा प्रयत्न केला. हे महाराष्ट्राचे दुर्दैव होते. नुकताच संसदेत ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ ने साडेदहा लाख कोटींचे कर्ज माफ केल्याची माहिती दिली. सदरचे कर्ज हे २१ लोकांचे माफ केले असून मात्र हे २१ लोक कोण याची नावे जाहीर केली जात नाही. त्यासाठी भाजपचा दबाव आहे.

मूठभर लोकांचे असलेले सरकार लोकभावना दाबत आहे. माध्यम देखील या घटना समोर आणत नाही. त्यामुळे भाजपा अर्थात भारतीय जुमला पार्टीची कहाणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘हात से हात जोडो’ उपक्रम राबविला जात आहे. आता परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी मताच्या तलवारीचा वापर करावा, असे आवाहन श्री पटोले यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी नगरसेवक शाहू खैरे हेमलता पाटील, माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव, राहुल दिवे, लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT