Nana Patole & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole Politics: पटोलेंनी फडणवीसांची सगळीच काढली, म्हणाले "हा तर बेईमान भाऊ आणि सर्वात अपयशी गृहमंत्री"

Nana Patole on Devendra Fadanvis: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकार फसवणूक आणि कारस्थानी असल्याचा आरोप केला आहे.

Sampat Devgire

Nana Patole on Fadnavis: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गृहमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. शासनाच्या योजना आणि राज्यातील स्थिती याबाबत त्यांनी महायुती सरकारवर गंभीर टीका केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे सगळेच काढले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज नाशिकला होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुती सरकारने सर्व काही निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन गेल्या शंभर दिवसात संशयास्पद काम केल्याचा आरोप यावेळी या दोन्ही नेत्यांनी केला.

यावेळी श्री. पटोले म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावरच निर्णयांचा पाऊस पडला आहे. यातील किती निर्णय खरे असतील, राजकीय हेतूने घेतलेले आहेत याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर लाडका देवा भाऊ अशा जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींवर पटोले यांनी गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. या जाहिराती म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर जनतेला भ्रमीत करण्याचा प्रय्तन आहे.

ते म्हणाले, हा देवा भाऊ नव्हे तर बेईमान भाऊ आहे. याने भावांच्या खिशातील पैसे काढले. जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. राज्यातील सरकार सध्या अशाच प्रकारे पैशांची उधळपट्टी करण्यात गुंग झाले आहे.

सरकारमधील नेत्यांना जनतेच्या भावना समजत नाहीत. योजना आणि पैसे देऊन जनतेची मते विकत घेता येत नाहीत. राज्यातील सध्याची अवस्था ही प्रत्येकाने चिंता करावी अशी आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

अगदी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांचीच दिवसाढवळ्या हत्या होते. त्यावर पोलीस सुपारी देऊन हत्या दिल्याचे केल्याचे सांगतात. प्रत्यक्षात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे अपयश आहे. त्यांनी यावर काय भूमिका मांडली? अपयशी म्हणून फडणवीस यांनी पायउतार होण्याची तयारी दाखवली का?. असा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे.

राज्याचे गृहमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वाधिक अपयशी गृहमंत्री असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ते म्हणाले, महायुती सरकारने काय काम केले? हे शोधायचे ठरविल्यास सापडत नाही. यांनी फक्त घोटाळे केले आहेत.गैरव्यवहार केले आहेत. ते अपयशी ठरले आहेत.

सरकारचे हे अपयश येत्या निवडणुकीत उघडे पडेल, या भीतीने सध्या महायुतीचे नेते धास्तावलेले आहेत. जनता निवडणुकीत त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही पटोले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT