Sameer Bhujbal Politics: पंकज भुजबळांच्या विधान परिषद नियुक्तीने सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा होईल का?

Nandgaon assembly : नांदगावचे माजी आमदार आणि छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे.
Suhas Kande & Sameer Bhujbal
Suhas Kande & Sameer BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal Vs Kande News: नाशिक जिल्ह्यात मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील राजकारण सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अधिक तापले होते. आता हे राजकारण नव्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या यादीत माजी आमदार पंकज भुजबळ यांचा समावेष झाला आहे. त्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. या नियुक्तीने नांदगाव विधानसभेच्या बहुचर्चित आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ कुटुंबीय यांच्यातील राजकीय वाद शमतो किंवा नाही, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

माजी आमदार पंकज भुजबळ यांनी दोन वेळा नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या निवडणुकीत आमदार कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार समीर भुजबळ आमदार कांदे यांच्या विरोधात उमेदवारी करण्यासाठी सज्ज झाले होते.

गेले महिनाभर माजी खासदार भुजबळ यांनी मतदारसंघात विविध उपक्रमांद्वारे मतदारांशी संपर्क सुरू केला होता. आमदार कांदे यांच्या विरोधातील महाविकास आघाडी तसेच अन्य स्थानिक नेत्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी पडद्यामागे आणि जाहीरपणे प्रयत्न सुरू केले होते.

Suhas Kande & Sameer Bhujbal
Ajit Pawar Politics: अजित पवार का म्हणाले, हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे!

नांदगावच्या आगामी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार भुजबळ यांचा प्रवेश झाल्याने आमदार कांदे चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी मंत्री भुजबळ यांना थेट आव्हान दिले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीमध्ये फुट पडणार हे जवळपास निश्चित झाले होते.

सध्या या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात. गणेश धात्रक यांनी गेले वर्षभर महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक उमेदवार म्हणून त्यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती देखील आहे.

माजी खासदार भुजबळ यांचा प्रवेश झाल्याने तिरंगी लढत होण्याची देखील एक शक्यता निर्माण झाली होती. नांदगाव मतदारसंघातील निवडणूक कांदे विरुद्ध भुजबळ या राजकीय संघर्षामुळे विशेष चर्चेत होती.

Suhas Kande & Sameer Bhujbal
Hiraman Khoskar: अजितदादांचा शब्द खरा ठरला! क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेला काँग्रेसचा आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

गेली पाच वर्ष मतदारसंघात विविध बाजार समित्या आणि अन्य निवडणुकांमध्ये कांदे विरुद्ध भुजबळ यांसह अन्य सर्व अशाच निवडणुका झाल्या होत्या. त्यात बाजार समित्यांच्या निवडणुकीत भुजबळ यांनी कांदे यांच्यावर मात केली होती. भुजबळ हे निवडणूक यंत्रणा आणि वातावरण निर्मितीत अनुभवी आहेत. त्यामुळे कांदे यांना पूर्वीसारखी निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र राहिले नव्हते.

या सर्व राजकीय संघर्षाला पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्याने नवे वळण मिळाले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहिले जात होते.

त्या दृष्टीने महायुतीने परस्परांतील हा वाद मिटविण्यासाठी पंकज भुजबळ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय दोन दिवसापूर्वी घेतला, अशी चर्चा आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीची शक्यता कमी झाली आहे. आमदार कांदे यांना सेफ मेसेज मिळेल, असे बोलले जाते. एकंदरच महायुतीमध्ये आमदार कांदे यांचा निवडणुकीचा मार्ग विधानपरिषदेच्या नियुक्ती त्यामुळे मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com