Nana Patole News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nana Patole News : कोळी समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळातही आवाज उठविणार : पटोलेंचे आश्वासन

कैलास शिंदे

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाला जात व्यवस्थाच संपुष्टात आणायची आहे. त्यामुळेच त्यांनी आरक्षणावरून राज्यात जाती-जातीत वाद निर्माण केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जळगाव येथे बोलताना केला. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी त्यांच्या समवेत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी उपस्थित होते. कोळी समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी कोळी समाजातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या वीस दिवसापांसून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला भेट दिल्यानंतर या वेळी समाजाला संबोधताना ते म्हणाले, कोळी समाजाला जातप्रमाणपत्र देण्यात येत होते, ते या भाजप (BJP) सरकारने बंद केले आहे. ते या सरकारने का बंद केले, त्याची अगोदर जनतेला माहिती द्यावी, राज्यातील व केंद्रातील सरकार (Central Government) संविधानविरोधी आहे, या सरकारने आर्थिक व शैक्षणिक आरक्षण धोक्यात आणले आहे, असा आरोप केला.

देशात जनगणणेच्या आधारावर आरक्षण दिले जाते. मात्र, सरकारने जनगणनाच केली नाही, त्यामुळे आता जनगणनाही सरकारने बंद केली असल्याचे दिसत आहे. जर जनगणनाच झाली नाही, तर आरक्षण संपुष्टात येईल. त्यामुळे देशाचे आरक्षण संपुष्टात आणण्याचा या सरकारचा डाव आहे. त्यामुळे मराठा, धनगर, कोळी समाज तसेच आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सरकार कोणताही विचार करण्यास तयार नाही. हे सरकार पक्त वल्गना करीत आहे, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

जाती जातीत हे सरकार भांडण लावत आहे. याच माध्यमातून त्यांना या राज्यात व देशातील जात व्यवस्थाच संपुष्टात आणून गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती या सरकारला ठेवायच्या आहेत. त्यातूनच गरिबांना अधिक गरीब ठेवून श्रीमतांना अधिक श्रीमंत करण्याची सरकारची खेळी असल्याचे पटोले म्हणाले. परंतु आपण मात्र समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कोळी समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळातही आवाज उठविणार असल्याचे आश्वास त्यांनी दिले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT