Karnataka Politics : ‘५० कोटी अन्‌ मंत्रिपद...भाजपची कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना ऑफर’

National Political News : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय, माजी स्वीय सचिव एन. आर. संतोष यांच्या माध्यमातून आमदारांशी संपर्क साधला जात आहे.
Karnataka Politics
Karnataka PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Bangalore News : काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून कर्नाटकात जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना आमिषं दाखवली जात आहेत, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दुजोरा दिला होता. आता तर काँग्रेस आमदाराने आकडाच फोडून बॉम्ब टाकला आहे. ('50 crores and a ministerial post...BJP's offer to Congress MLAs in Karnataka')

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवी गनिगा यांनी भाजपवर आरोप केला आहे, त्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. खुद्द आमदारच पुढे येऊन बोलत असल्याने भाजपकडून खरंच ‘ऑपरेशन लोटस’ सुरू आहे की काय, असे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karnataka Politics
Pawar Vs Modi : नरेंद्र मोदींना घायाळ करणारा शरद पवारांचा ‘दुसरा’...

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय, माजी स्वीय सचिव एन. आर. संतोष यांच्या माध्यमातून आमदारांशी संपर्क साधला जात आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या चार आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, असाही गौप्यस्फोट आमदार रवी गनिगा यांनी केला आहे. विशेष म्हणजे आमदार रवी यांनी हे आरोप करताना भाजपचे नाव घेतलेले नाही.

मागील वेळी राज्यात स्थापन झालेले देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस सरकार अशाच पद्धतीने पाडण्यात आले होते. त्या युतीच्या सरकारमधील असंतुष्ट आमदारांंना शोधून सरकार अस्थिर करण्यात संतोष यांनीच पुढाकार घेतला हेाता. खरं त्यावेळी येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. धजदकडून संतोष यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना शहापण आलेले नाही. आताही ते सरकार पाडण्याची भाषा बोलत असून, तशा घडामोडी घडत आहेत. त्याबाबतचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत, असेही आमदार रवी यांनी स्पष्ट केले.

Karnataka Politics
INDIA Bloc News : इंडिया आघाडीतही मतभिन्नता, विधानसभेला तेवढं सोपं नाही; पवारांचे मतभेदाच्या नेमक्या मुद्द्यांवर बोट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना काँग्रेस आमदारांना दाखविण्यात येणाऱ्या आमिषबाबत माहिती दिली आहे. आमच्या पक्षाच्या कोणत्या आणि किती आमदारांना आमिषं दाखवण्यात आली आहेत, हेही लवकरच उघड करण्यात येईल, असा इशाराही रवी यांनी दिला आहे.

शिवकुमारांनी मागील आठवड्यात दिली होती माहिती

दरम्यान, भाजपकडून कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी कट रचण्यात आलेला आहे. त्याची पूर्ण कल्पना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मला आहे. भाजपची टीम कोणत्या आमदारांना भेटत आहे. ‘ऑपेरशन लोट्‌स’साठी आमदारांना काय ऑफर दिली जात आहे. याबाबतची सर्वकाही माहिती आमच्याकडे आलेली आहे. या प्रत्येक घडामोडीची माहिती माझ्याकडे आहे. विधानसभेचे अधिवेशन झाल्यानंतर भाजपच्या कोणत्या टीमने कोणत्या आमदाराशी चर्चा केली, हे आमदारच समोर येऊन सांगतील, असेही उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.

Karnataka Politics
Nilavande Water Issue : पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या ‘निळवंडे’च्या पाण्यासाठी खासदारांचा अल्टिमेटम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com