ED Raid Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News: BJP नेत्यांवर ED कारवाई दाखवा, 1 लाखाचे बक्षिस जिंका! NCPकडून बॅनरबाजी

BJP Political News :अजित पवार दौऱ्यावर येण्यापूर्वीच कार्यकर्ते आक्रमक

Mangesh Mahale

Nandurbar Political News : ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याने त्याविरोधात विरोधकांनी नेहमीच आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून कारवाई केली जात असल्याचा आरोप मोदी सरकारवर होत आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. आज त्यांची दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या ईडी कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यक्रर्ते आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. तळोदा शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि १ लाखाचे बक्षीस मिळवा अशा आशयाचे मार्मिक फलक लावले आहेत.

NCP News

विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करण्यात आले. ते नेते भाजपसोबत गेल्यावर पवित्र झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना लावलेलं फलक त्यांना डिवचण्यासाठी तर नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT